आमदार जयदत्त क्षीरसागर यांचे  राजकीय वारसदार पुतणे डॉ. योगेश ठरणार ?

YOGESH
YOGESH

बीड : राजकीय पटलावर कायम चर्चा होणारा ‘काका - पुतण्या’ अंकातील दोन प्रयोग जिल्ह्यात झाले. यातील एक प्रयोग क्षीरसागरांच्या घरातही झाला. पण, एका पुतण्याने काका जयदत्त क्षीरसागर यांचे बोट सोडूले असले  तरी दुसरा पुतण्या राजकीय मैदानात उतरला आहे. 

आमदार जयदत्त क्षीरसागरांची दोन्ही मुले व्यवसायात स्थिरावलेले असल्याने पुतणे डॉ. योगेश क्षीरसागर  यांच्याकडे  जयदत्त क्षीरसागर आपला   राजकीय वारसा सोपवणार अशी चिन्हे दिसत आहेत . 

 कै . केशरकाकू  क्षीरसागर यांनी अतिशय   कल्पकतेने आणि चिकाटीने माणसे जोडली . सर्वसामान्यांच्या सुखदुःखाचा धावून जाणाऱ्या केशरकाकूंनी मातब्बर पुढाऱ्यांच्या भाऊगर्दीत स्वतःचे स्थान निर्माण केले . कार्यकर्त्यांचे जाळे विणले . 

शैक्षणिक आणि सहकारी संस्थांचे साम्राज्य उभे केले . काँग्रेस पक्षात त्याकाळी बाबुराव आडसकर , शिवाजीराव पंडित , सुंदरराव सोळंके असे धुरंधर नेते असताना स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली  थोरले चिरंजीव  म्हणून जयदत्त क्षीरसागर  राजकारणात लवकर ओढले गेले . राजकारणाचेर धडे त्यांनी काकूंच्या माग्दार्शनाखाली गिरवले .

 जिल्ह्याच्या राजकारणात क्षीरसागर घराण्याचा दबदबा आणि दरारा निर्माण करण्यात जयदत्त यांनी महत्वाची भूमिका बजावली . जिह्यातील मातब्बर पुढाऱ्यांविरुद्ध  जयदत्त क्षीरसागर यांनी अनेक लढाया आपल्या चातुर्याच्या जोरावर जिंकल्या . 

अनेकदा आमदार राहिलेल्या जयदत्त क्षीरसागर यांनी  राज्य मंत्रिमंडळात अनेक महत्वाची खाती हाताळलेले आहेत .   राजकीय डावपेचात अतिशय निष्णात असलेल्या जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्ह्याच्या राजकारणात चांगला जम बसवलेला आहे . 

जयदत्त यांचे दुसऱ्या क्रमांकाचे बंधू रविंद्र क्षीरसागर गजानन कारखाना आणि जिल्हा परिषद - पंचायत समिती पाहतात .  तिसरे बंधू  डॉ. भारतभूषण क्षीरसागर बीड नगर पालिका आणि सर्वात धाकटे बंधू डॉ. विठ्ठल हे वैद्यकीय क्षेत्रात आहेत. 

तिसऱ्या पिढीत रविंद्र क्षीरसागर यांचे चिरंजीव संदीप क्षीरसागर यांनी पंचायत समिती सभापती म्हूणन राजकीय सुरुवात करत नंतर जिल्हा परिषदेतही सभापती म्हणून काम केले. त्यामुळे तेच जयदत्त क्षीरसागर यांचा राजकीय वारसा चालवतील असे गणित मांडले जात होते. 

पण, नगर पालिका निवडणुकीदरम्यान संदीप क्षीरसागरांनी स्वतंत्र मार्ग निवडला. नेमकी हिच वेळ दुसरे पुतणे डॉ. योगेश क्षीरसागरांसाठी राजकीय संधी ठरली. पालिका निवडणुकीच्या माध्यमातून लोकांमध्ये हळूहळु मिसळणाऱ्या चिरंजीव डॉ. योगेश यांना पिता डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी स्विकृत नगरसेवक केले. 

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामीण भागात जाण्याची संधीही डॉ. योगेश यांना लाभली . या निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली चांगले यश आल्याने यशातील श्रेयाचा वाटा सहाजिकच डॉ. योगेश क्षीरसागर यांनाही गेला. 

 गुरुवारी डॉ. योगेश क्षीरसागर यांचा वाढदिवस मोठ्याच थाटामाटात झाला. शहरासह मतदार संघात डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसाचे कार्यक्रम आणि होर्डिंग लावत जणू एक प्रकारे त्यांचे राजकीय लाँचिंगच केले. 

जयदत्त क्षीरसागर यांची दोन्ही मुले व्यवसायात स्थिरावलेली असून दोघेही राजकीय परिघापासून कायम दुरच असतात.

त्यामुळे भविष्यात आमदार क्षीरसागरांचा राजकीय वारसा भविष्यात पुतणे डॉ. योगेश क्षीरसागरांकडेच येणार  असे   मानले जात आहे. मुत्रविकार आणि किडनी विकार तज्ज्ञ असलेले डॉ. योगेश क्षीरसागर राजकीय शस्त्रक्रीया कशी करणार यावर त्यांचे राजकीय भविष्य आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com