संदीप क्षीरसागरांचा कामाचा झपाटा; रोज एका मंत्र्याला भेटून प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी पाठपुरावा

मागच्या चार दिवसांत संदीप क्षीरसागर रोज एका कामासाठी एका मंत्र्यांना भेटत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अखत्यारित असलेल्या कामासाठी त्यांनी सुप्रिया सुळे यांचीही भेट घेतली
Sandeep Kshrisagar Meeting Various Ministers and Leaders
Sandeep Kshrisagar Meeting Various Ministers and Leaders

बीड : मातब्बर जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात सामान्यांनी विजयाची माळ गळ्यात टाकल्याने जबाबदारी अधिक वाढल्याची जाण आमदार संदीप क्षीरसागर यांना आहे. मागच्या चार दिवसांत ते रोज एका मंत्र्यांना भेटून एक प्रश्न मार्गी लावत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अखत्यारित असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधीत प्रश्नासाठी त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली.

राजकारणात मातब्बर समजले जाणारे, राजकीय डावपेचांची जाण आणि मोठा अनुभव तसेच विविध खात्यांचे मंत्रीपद भूषविलेले आणि त्यावेळीही मंत्री असणाऱ्या काका जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव करुन संदीप क्षीरसागर राष्ट्रवादीकडून विजयी झाले. प्रथमच विधानसभेत पोचलेल्या संदीप क्षीरसागर यांना लोकांनी टाकलेल्या विश्वासाची जाण असल्याचे त्यांच्या कामातून दिसत आहे. जिल्ह्याचे शहर असलेल्या बीड मतदार संघातून विजयी झाल्याने येथील प्रश्नही अधिक आणि अपेक्षाही अनेक आहेत. त्यामुळे पाठपुराव्याशिवाय पर्याय नसल्याने लक्षात आल्याने त्यांनीही कामाचे योग्य नियोजन केल्याचे दिसत आहे. 

दरम्यान, मागच्या चार दिवसांत त्यांनी रोज एका मंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडून एकेक प्रश्न मार्गी लावला आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अखत्यारित असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या संदर्भात त्यांनी सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. रामनगर ते जालना रोड - छत्रपती शिवाजी महाराज यांचा -पुतळा-बार्शी नाका-कोल्हारवाडी  पर्यंतचा १२ किलोमिटर अंतराचा रस्ता तयार करावा, यासह याच महामार्गावरील चौसाळा येथील रस्तासाठी १०० कोटीच्या प्रत्सावीत आराखड्याच्या कामाची सुरुवात करावी, या महामार्गावरील बाह्यवळण रस्त्यावर सर्व्हिस रोड तयार करावेत, आदी मागण्या त्यांनी सुळेंच्या कानावर घालून त्याबाबतच्या मागण्यांचे निवेदनही दिले. 

शहरातील रखडलेल्या पोलिस वसाहतीच्या बांधकामासाठी त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन चर्चा केली. बीडसह शिरुर कासार पोलिस ठाण्याची इमारत, अंबाजोगाई येथे पोलीस क्लब तसेच आष्टी येथील उपविभागीय कार्यालयासाठी इमारतींसाठी निधी देण्याची मागणी त्यांनी अनिल देशमुख यांच्याकडे केली. शुक्रवारी त्यांनी शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीच्या सुशोभीकरणाच्या कामाला निधी मिळावा म्हणून मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. पाटलांनीही आराखडा तयार करण्याच्या सुचना दिल्या आहेत.  नदी पात्रात बंधारे, पूल, दगडी पुलाचे पुनर्वजीवन, पूर संरक्षण भिंत, नदीची स्वच्छता, सुशोभिकरणं कामांचा समावेश असेल. शहराच्या हद्दीत नदी किनारी सौर पथदिवे बसविण्याचा आराखड्यात समावेश करण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com