व्याख्यात्या मंदा सोळंकेच्या पश्चात कुटूंबियांना आमदार धसांकडून आधार; दोन लाखांची मदत

विद्यार्थी दशेतच आपल्या वक्तृत्वाच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह विविध राष्ट्रपुरुषांवर व्याख्यान देणाऱ्या धारुर तालुक्यातील मंदा सोळंके हीचे अपघाती निधन झाले. तिच्या कुटूंबियांना आमदार सुरेश धस यांनी दोन लाख रुपयांची मदत केली.
व्याख्यात्या मंदा सोळंकेच्या पश्चात कुटूंबियांना आमदार धसांकडून आधार; दोन लाखांची मदत

आष्टी (जि. बीड) : विद्यार्थी दशेतच आपल्या वक्तृत्वाच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह विविध राष्ट्रपुरुषांवर व्याख्यान देणाऱ्या धारुर तालुक्यातील मंदा सोळंके हीचे अपघाती निधन झाले. तिच्या कुटूंबियांना आमदार सुरेश धस यांनी दोन लाख रुपयांची मदत केली.

आमला (ता. धारुर) येथील मंदा सुंदरराव सोळंके ही बीडमध्ये पत्रकारितेचे शिक्षण घेत होती. सामान्य कुटूंबातील असलेली मंदा वक्तृत्वात तरबेज होती. राष्ट्रपुरुषांच्या जयंती कार्यक्रमांत ती आपल्या व्याख्यानातून राष्ट्रपुरुषांचा इतिहास तरुणांना सांगत असे. वक्तृत्व स्पर्धांमध्येही तीने नेहमी अव्वल क्रमांक पटकावले. मंदा सोळंकेमुळे आमला या छोट्याशा गावची सर्वत्र ओळख झाली. 

मधल्या काळात मराठा क्रांती मोर्चा आंदोलनातही तिची भाषणे गाजली. गरिब कुटूंबातील मंदा सोळंके भविष्यात कुटूंबाचा आधार होती. मात्र, काही दिवसांपूर्वी बीडजवळ वाहनाने धडक दिल्याने तीचा पाय निकामी झाला. औरंगाबाद येथे उपचार सुरु असताना तीचे दुर्दैवी निधन झाले. उपचाराच्या खर्चामुळे गरिब कुटूंबिय कर्जात बुडाले. 

दरम्यान, या कुटूंबियांना मदत आणि धीर देण्याचा शब्द सुरेश धस यांनी दिला. त्यानुसार शनिवारी धस यांनी दोन लाख रुपयांची रक्कम तिच्या कुटूंबियांना पाठवून दिली. भारत जगताप, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कवठेकर, व्याख्याते ज्ञानदेव काशिद, अशोक सुपेकर, प्रा. प्रविण सानप, प्रा. महादेव जायभाये, अशोक सुखवसे यांनी ही रक्कम मंदाच्या आई - वडिलांना सुपूर्द केली. या रकमेमुळे कुटूंबियांना मदत तर झालीच शिवाय मोठा धीरही मिळाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com