प्रितम मुंडेंनी रक्षाबंधनाच्या ओवाळणीची रक्कमही दिली पुरग्रस्तांच्या मदतीसाठी

भाजपच्या पुढाकाराने निघालेल्या फेरीत खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्याकडे मदत जमा झाली. त्यानंतर त्यांच्या यशश्री निवासस्थानी त्यांच्याकडून राखी बांधून घेतल्यानंतर ओवाळणीसाठी आलेली रक्कमही त्यांनी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी दिली.
प्रितम मुंडेंनी रक्षाबंधनाच्या ओवाळणीची रक्कमही दिली पुरग्रस्तांच्या मदतीसाठी

परळी (जि. बीड) : सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी शहरात भाजपतर्फे गुरुवारी खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या पुढाकाराने काढलेल्या फेरीत ११ लाख २५ हजार रुपयांची मदत जमा झाली. रक्षाबंधनाच्या ओवाळणीची रक्कमही त्यांनी पुरग्रस्तांना दिली. 

शहरातील हमाल, मापाडी, रिक्षा चालक, व्यापारी, विक्रेते व वृद्धांनी पुरग्रस्तांप्रती संवेदनशीलतेचे दर्शन घडवत सढळ हाताने मदत दिली. फेरी दरम्यान वैद्यनाथ बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पूरग्रस्तांसाठी एका दिवसाचे वेतन मदत म्हणून तर भेल सेकंडरी इंग्लिश स्कुल, शहीद अब्दुल हमीद सेवाभावी संस्था या संस्थांनी ही मदतीचे धनादेश खासदार डॉ. मुंडे यांच्याकडे जमा केले. 

निसर्गाच्या अवकृपेने बीड जिल्हा सतत दुष्काळाशी सामना करत आहे. जिल्ह्याला दुष्काळी परिस्थितीने जरी ग्रासले असले तरी जनतेच्या मनात मायेचा ओलावा कायम असल्याचे यातून दिसते अशी भवान डॉ. प्रितम मुंडे यांनी व्यक्त केली. केल्या.

मदत फेरी नंतर रक्षाबंधना निमित्त परळी येथे यशश्री निवासस्थानी डॉ. प्रितम मुंडे यांनी उपस्थितांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांना ओवाळणी म्हणून आलेली रक्कम पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर या भागातील पूरग्रस्त बांधवांच्या  मदतीसाठी देऊ केली.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com