आपण अतिरेक्‍यांना बाहेर काढतोय आणि भाजपमध्येच गुंडगिरी मात्र वाढतेय : विजयकुमार पालसिंगणकर

आपण अतिरेक्‍यांना बाहेर काढतोय आणि भाजपमध्येच गुंडगिरी मात्र वाढतेय : विजयकुमार पालसिंगणकर

बीड : भाजप सरकार देशातील अतिरेकी बाहेर काढत असले तरी गुंडगिरी करणाऱ्यांची संख्या भाजपमध्ये वाढत आहे. हयात घालविलेल्यांना सत्तेच्या लालसेपोटी भाजपमध्ये आलेले निष्ठा शिकवत आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया जेष्ठ भाजप नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते विजयकुमार पालसिंगणकर यांनी व्यक्त केली. 
भाजपकडून विधानसभा इच्छुकांच्या मुलाखतीला आलेल्या पालसिंगणकर यांना भाजपच्याच जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्याने मारहाण केल्यानंतर त्यांनी आपला उद्वेग व्यक्त केला. 

मारहाण झाल्याचा संताप असला तरी त्याने थापड मारली म्हणून परत मारणे ही आम्हाला शिकवण नाही. पण, अशी वाढती गुंडगिरी चांगली नाही, ही पक्षाची संस्कृती नाही असेही विजयकुमार पालसिंगणकर म्हणाले. पोलिसात तक्रार केली नाही व करणार नाही कारण सरकार आमचे, मुख्यमंत्री आमचे मग पोलिस यापेक्षा काय मोठे असेही ते म्हणाले. याबाबत पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले. 

पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री व विधानसभेसाठी बीड जिल्हा निरीक्षक बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. यावेळी मुलाखतीसाठी आलेल्या विजयकुमार पालसिंगणकर यांना भाजपच्याच जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्याने मारहाण केली. 1975 पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक असलेले विजयकुमार पालसिंगणकर जनसंघापासून भाजपशी एकनिष्ठ आहेत. दिवंगत गोपीनाथराव मुंडे, दिवंगत प्रमोद महाजन यांच्यासोबत काम केलेल्या पालसिंगणकर यांनी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यक्रमाचेही आयोजन केलेले आहे. आणीबाणीत तुरुंगवास भोगलेले विजयकुमार पालसिंगणकर हे लोकतंत्र (आणीबाणीत तुरुंगवास भोगलेले) सेनानी संघाचे जिल्हाध्यक्ष आहेत. अशा जेष्ठ आणि निष्ठावान कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीमुळे संताप व्यक्त होत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com