कोरोनाशी लढा : राज्याला दिशादर्शक पॅटर्न देणारा बीड लढ्यासाठीही अधुनिक शस्त्रासंह सज्ज

प्रत्येक पावलांवर कडक नियम आणि त्याची अंमलबजावणी सुरु असल्याने रस्त्यांवर चिटपाखरु दिसायला तयार नाही. शिथीलतेचा वेळही राज्यात सर्वात कमी बीडला असून या काळातही दुचाकी वापराला बंदी आहे. अद्याप बीड जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. भविष्यात काही घडले तर त्याचाही बी प्लॅन तयार आहे.
Beed administration well equipped to fight against coronavirus
Beed administration well equipped to fight against coronavirus

बीड : कुठल्या ना कुठल्या बाबीने नेहमी चर्चेत आणि नाव खराब असलेल्या बीड जिल्ह्याचा कोरोनाशी लढण्याचा पॅटर्न मात्र राज्यासाठी दिशादर्शक ठरावा असा आहे. सर्वाधिक स्थलांतरीत जिल्हयात अद्यापतरी एकही कोरोनाची लागण झालेला आणि संशयित रुग्ण सापडला नाही. भविष्यात काही अघटीत घडलेच तर त्याच्यासाठीचा बी प्लॅनही तयार आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत १६ जणांच्या स्वाबची तपासणी केली असून सर्वच अहवाल निगेटीव्ह आले आहेत. पुणे - मुंबईसह इतर जिल्ह्यात काम - धंदे आणि नोकरीला गेलेले आणि ऊसतोडणीसाठी स्थलांतरीत झालेले दाखल होत आहेत. त्यातून काही उद्भवले तर त्याच्यासाठीच्या उपाय योजना प्रशासनाने आतापासूसनच तयार केल्या आहेत.

कोरोना विषाणूच्या फैलावाचे गर्दी हे मुख्य कारण असून यावरच प्रशासनाने तोडगा काढत त्याची कडक अंमलबजावणी केल्याने आतापर्यंत तरी परिस्थिती अटोक्यात आहे. विशेष म्हणजे पुण्यात दुबईहून कोरोना घेऊन आलेल्या विमानात प्रवास करणारेही बीडचे तिघे होते. स्थानिक पातळीवर प्रतिबंधात्मक उपाय योजनांची कडक अंमलबजाणी हेच याचे मुख्य कारण आहे. यातल्या अनेक उपाय योजना राज्यात इतरत्र आढळत नाहीत हेही विशेष. या सर्व कामात जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राहूल रेखावर, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक थोरात, स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांचे प्रयत्न आणि चोख नियोजन जितके महत्वाचे आहे तेवढेच जिल्ह्यातील नागरिकांचा प्रतिसादही यात वाखणण्याजोगा आहे.

कडक अंमलबजावणी

  • आदेशाच्या उल्लंघनाचे २५० आरोपींवर गुन्हे
  •  कोरोनाबाबत सोशल मिडीयावरुन अफवांचे १५ जणांवर गुन्हे
  • अत्यावश्यक सेवांसाठी सकाळी सात ते साडेनऊ एवढीच शिथीलता.
  • अत्यावश्यक सेवांसाठीच पंपांवरुन इंधन.
  • बाहेरुन येणाऱ्या ५५ हजार जणांची चेकपोस्टवरच झाली तपासणी.
  • परदेशातून, बाहेर जिल्ह्यातून आलेले ३९० जणांचे होम क्वारंटाईन.
  • होम क्वारंटाईन असलेल्यांची ‘LIFE FREE 360’ या ॲपरव नोंद.
  • होम क्वारंटाईन असलेल्यांनी हालचालीवर ॲपद्वारे नियंत्रण.
  • खासगी - सरकारी दवाखान्यांत तपासणीत काही लक्षणे आढळले तर ‘Covid 19 90 BEED’ ॲपर नोंदीमुळे यंत्रणेचे लक्ष.
  • बाहेरुन आलेल्यांची आशा, अंगणवाडी सेविका, डॉक्टर यांच्याकडून नोंद आणि प्राथमिक तपासणी.
  • ऊसतोडणीहून परतलेल्यांची गावाबाहेर शाळांतच राहण्या - खाण्याची सोय.
  • निराश्रीत, निराधारांना सापडून त्यांच्या निवारा आणि जेवणाची सोय.
  • आठवडी बाजार भरल्यावरुन बीडीओ, ग्रामसेवक व सरपंचांनाही थेट नोटीसा बजावण्यात आल्या.
  • शिथीतलेच्या काळातही वाहन वापरावर बंदी अन्यथा जप्ती.
  • सामुदायिक प्रार्थना केल्यावरुन ५० जणांवर गुन्हे.

अधुनिक शस्त्रांसह फौजा सज्ज

  • जर एखादा रुग्ण आढळला तर आरोग्य विभागाची ४६० पथके.
  •  रुग्ण आढळलेल्या गावांच्या तीन किलोमिटर अंतराच्या सिमा सिल करुन या पथकांद्वारे संपर्कातील लोकांचा शोध घेणार.
  • बीड, अंबाजोगाई, केज व परळीत तीनशे खाटांच्या क्षमतेचे अलगीकरण कक्ष.
  • सर्व तालुक्यांच्या ठिकाणी विलगीकरण कक्षांत ७०० खाटांची सोय.
  •  बीड, अंबाजोगाई, केज व परळीत ३०० खाटांच्या क्षमतेचे विलगीकरण कक्ष.
  •  ११ ठिकाणी ७०० खाटांच्या क्षमतेचे अलगीकरण कक्ष.
  •  दोन हजार पीपीई किट दाखल, आणखी आठ हजार मिळणार.
  •  थ्री लेअल ५० हजारांवर मास्क उपलब्ध.
  • जिल्ह्यातच दोन ठिकाणी सॅनिटायझर निर्मिती.
  • तीन हजारांवर एन. ९५ मास्क उपलब्ध.
     

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com