दिल्लीतील 'तबलीग'च्या कार्यक्रमाला बीडचे नऊ जण हजर होते!

या धार्मिक कार्यक्रमासाठी दहा जण निघाले होते. परंतु, आजारी पडल्यामुळे एक जण वाटेतूनच परतला. कार्यक्रमाहून परतलेल्या दोघांना होम क्वारंटाईन केले असून उर्वरित सात जण बाहेरच आहेत.
Beed administration quarantine two people who attend tablig programme
Beed administration quarantine two people who attend tablig programme

बीड : दिल्लीतील 'तबलिग ए जमात' या धार्मिक कार्यक्रमाला बीड मधील नऊ जणांची उपस्थिती होती. यापैकी परतलेल्या दोघांना होम क्वारंटाईन केले आहे. पंरतु, यातील सात जण बाहेरच असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावरही त्या त्या ठिकाणी वॉच आहे.

दिल्ली येथील तबलीग या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही व्यक्तींचा कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या कार्यक्रमात देशभरातील विविध भागांतील नागरिकांचा सहभाग हेाता. या कार्यक्रमात बीड मधील नऊ जणांनीही उपस्थिती लावली होती. या नऊ पैकी दोघा जणांना बीड जिल्हा प्रशासनाने 'होम क्वॉरंटाईन' केले आहे. तर, उर्वरित सात जण अद्यापही बीड जिल्ह्याच्या बाहेर आहेत. जिल्ह्यात आलेल्या त्या दोघांची तब्येत ठणठणीत आहे. आरोग्य विभागाकडून त्यांची रोज तपासणी होत आहे.

बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हा प्रशासनाकडून या विषयाची माहिती घेतली. दरम्यान, दिल्लीतील या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी जिल्ह्यामधून १० जण निघाले हेाते. परंतु, एक जण आजारी पडल्यामुळे निम्म्या वाटेतून परतला. उर्वरित नऊ जणांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली. त्यापैकी दोघे टप्प्या टप्प्याने बीडला परतले. त्यांचे 'होम क्वॉरंटाईन' केले आहे. मात्र, त्यांचा दिल्लीतील कार्यक्रमात सहभाग असल्याचे आढळल्यानंतर आता अधिक सावधगिरी बाळगली जात आहे. त्यांच्यावर आरोग्य विभागाची निगराणी आहे. दोघांचीही प्रकृती ठणठणीत असून यंत्रणेकडून त्यांच्या आरोग्याबाबत वारंवार विचारपूस केली जात आहे. मात्र, उर्वरित सात जण अद्याप बाहेरच विविध सात ठिकाणी आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com