Because of Hafkin's mismanagement medicine supply is disturbed : Girish Bapat | Sarkarnama

हाफकिन'च्या कारभारामुळे औषधी पुरवठ्यात अडथळे : गिरीश बापट 

सरकारनामा
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

पत्रकार परिषदेत बापट यांना औषधी पुरवठ्यातील गोंधळावर आपली भूमिका स्पष्ट केली.

औरंगाबाद: सरकारी रुग्णालयाला औषधी पुरवठ्यासाठी स्थापन केलेल्या हाफकीन महामंडळाच्या तांत्रिक अडचणींमुळे वितरण व्यवस्था कोलमडल्याची कबुली अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी औरंगाबादेत दिली.

तसेच मागणीनुसार पुरवठा करण्याबाबत टेंडर प्रक्रीया सुरू असून त्यामध्ये सुधारणा करण्यात येत असल्याने महिनाभरात हा प्रश्‍न मार्गी लावू, असा दावा देखील त्यांनी केला. 

विभागीय आयुक्‍तालयात सोमवारी (ता. 15) गिरीश बापट यांच्या उपस्थितीत विविध विभागप्रमुखांची बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बापट यांना औषधी पुरवठ्यातील गोंधळावर आपली भूमिका स्पष्ट केली. हाफकीनची वितरण प्रणाली व्यवस्थित राबविली गेली नाही, ही संपुर्ण यंत्रणा व्यवस्थीत करावी लागणार आहे. 

12 महिने औषधी पुरवठा करण्याबाबतची मागणी नोंदवून घेतली जाते. त्यानुसार पुरवठा करण्याबाबत टेंडर प्रक्रीया राबविण्यात येते. जवळपास अडीचशे कोटींच्या औषधींच्या टेंडरला मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे महिनाभरात यात सुधारणा होईल, असा दावा त्यांनी केला. 

राज्यात गुटखा बंदी असतानाही शहरात दररोज एक ट्रक गुटखा येतो, त्यासाठी मोठी आर्थिक देवाण- घेवाण होत असल्याचा प्रश्‍न यावेळी उपस्थित करण्यात आला. त्यावर मंत्री बापट यांनी गुटख्याबाबत राज्यातअधिक  कडक कारवाई झाली पाहिजे असे  सांगून टाकले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख