हर्षवर्धन व भरणेंच्या विजयासाठी पैज! मताधिक्याऐवढी रक्कम मिळणार

हर्षवर्धन व भरणेंच्या विजयासाठी पैज!  मताधिक्याऐवढी रक्कम मिळणार

वालचंदनगर : आमदार दत्तात्रेय भरणे व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये विधानसभेची निवडणूक चुरशीची होणार आहे.  दोघांच्या लढतीकडे इंदापूर तालुक्यासह राज्याचे लक्ष लागले असून आमदार  दत्तात्रेय भरणे की, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील विजयी होणार,  यासाठी तालुक्यातील कार्यकर्ते स्टॅंप पेपरवर पैजा लावू लागल्या आहेत.

भाजपकडून हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारीची घोषणा करण्यात आली. राष्ट्रवादी कडून येत्या दोन दिवसामध्ये आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या उमेदवारीची घोषणा निश्‍चित होणार आहे.

राज्यामध्ये चुरशीच्या लढतीमध्ये इंदापूरच्या जागेचा समावेश आहे. तालुक्यातील कार्यकर्त्यामध्ये निवडणुकीचे वारे जोरादार वाहू लागले आहे.

जंक्शन मधील नितीन भारत साबळे  व सोमनाथ ऊर्फ संभा भारत बनसोडे यांनी पैज लावली आहे. आमदार भरणे जेवढ्या मताधिक्यांनी विजयी होतील तेवढी रक्कम नितीन साबळे स्वखुशीने देणार आहेत. हर्षवर्धन पाटील विजयी  झाल्यास मताधिक्याएवढी रक्कम बनसोडे हे साबळे यांना देणार आहेत. तसा त्यांनी करार केला आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com