`अजूनही शहाणे व्हा! स्मशानात जाळायला लाकडंसुद्धा शिल्लक राहणार नाहीत!!`

लाॅक डाऊन काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांचे मुस्काड पोलिसांनी फोडले तर त्यांचे काय चुकले, असा प्रश्न नानांनी उपस्थित केला आहे.
nana patekar
nana patekar

पुणे : "अजूनही शहाणे व्हा. स्मशानात जाळायला लाकडंसुद्धा शिल्लक राहणार नाहीत. कारण नसताना कुतूहल म्हणून घराच्या बाहेर पडू नका. बाहेरून फिरून आल्यावर तुम्ही घरात जाताना एकटे जात नाहीयेत तर सोबत हा रोग घेऊन जात आहात. तुम्ही रस्त्यावर येऊन तुमच्या एकट्याचा जीव संकटात टाकत नसून सगळ्या समाजाचा जीव संकटात लोटत आहात. तेव्हा बाहेर पडू नका," असे कळकळीचे आवाहन हात जोडून अभिनेते नाना पाटेकर यांनी लोकांना  केले आहे.

पाटेकर यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

"सरकारने हा लॉक डाउनचा निर्णय का घेतला आहे? आमच्याच हितासाठी घेतला आहे. आपण घरात थांबल्याने सगळं अर्थकारण थांबलं आहे.त्याचा काही सरकारला फायदा आहे का? सरकारने आमच्यावर का निर्बंध घातले आहेत हे आम्हाला माहिती नाही का? पण सगळं माहिती असूनही आम्ही एक कुतूहल म्हणून रस्त्यावर उतरतो. काय चालले आहे म्हणून बाहेर पडतो. वेगवेगळी कारणे सांगतो आणि उगाच रस्त्यावर फेरफटका मारतो. किती मूर्खपणा आहे का? हे करताना मी माझ्या कुटुंबातील लोकांसह सगळ्यांना वेठीस धरतोय.कसला हव्यास हा? तुम्ही घरी बसला आहे आणि मी बघा रस्त्यावर उतरलोय हा मोठेपणा दाखवण्यासाठी आणि मग दोन लाठ्या पोलिसांनी चढवल्या तर काय चुकलं त्यांचं, असा उद्वेगजनक प्रश्न त्यांनी विचारला.

पोलिस विनाकारण मारताहेत का लाठ्या? हवेत फिरवताहेत का लाठ्या? मी चाललोयना मोटरसायकल घेऊन! कपाळाला आणि गळ्याला रुमाल बांधून. मग माझं मुस्काड फोडलं पोलिसांनी? काय चुकलं त्यांच? माणसच आहेत ना पोलिससुद्धा? काय चुकलं त्यांच? त्यांना होऊ शकत नाही का हा रोग? किती वैफल्य येत असेल त्यांना? एवढं सांगूनही लोक ऐकत नाहीत. अनाथांना जेवण देणं हे पोलिसांचं काम आहे का? त्यांची चोवीस तासाची ड्युटी! आता तर ती अजूनही वाढलेली आहे. लवकर सकाळी ते लोक बाहेर पडतात. पोलिस, डॉक्टर, शासकीय यंत्रणा किती राबत आहे! आपल्याला त्याच काहीच वाटत नाही. निर्लज्ज आहोत का आम्ही? बर आपण बाहेर पडून काय करत आहोत. घरात आल्यावर आपली आई, मुलं, बायको, भावंड, शेजारी यांना आपण या रोगात लोटणार आहोत काय," असा सवाल पाटेकर यांनी उपस्थित केला आहे.

"हे मी आपणास शेवटच सांगत आहे. हात जोडून सांगतो बाहेर पडू नका,"असे त्यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com