Be careful! Such a time may come upon you too! | Sarkarnama

लोकहो सावधान ! अशी वेळ तुमच्यावरही येऊ शकते ! 

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 मार्च 2020

कर्नाटक राज्यातील कलबुर्गी येते काही तरूण एकत्र आले होते. पोलिसांनी त्यांना दंडुक्‍याचा प्रसाद देतानाच उठ्याबशा काढायला लावल्या.

हुबळी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन केल्यानंतर देशाच्या अनेक भागात काही मंडळी या नियमाचे उल्लंघन करताना दिसून येत आहे. त्यामुळे नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलिसही दंडुक्‍याने जागच्या जागी शिक्षा करीत आहे. 

कर्नाटक राज्यातील कलबुर्गी येते काही तरूण एकत्र आले होते. पोलिसांनी त्यांना दंडुक्‍याचा प्रसाद देतानाच उठ्याबशा काढायला लावल्या. यावेळी पोलिसांच्या दंडुक्‍याचा प्रसाद खातानाचा कर्नाटकातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रसाद तर मिळालाच शिवाय कान धरून बेडूक उड्याही माराव्या लागल्या. म्हणून लोकांनो सावधान अशी वेळ तुमच्यावरही येऊ शकते. एकत्र येऊ नका, तर घराबाहेर पडताना एकटे जा ! खरेदीला एकटेच जा ! लॉकडाऊनचे उल्लंघन करू नका . कोरोनापासून बचाव करण्यासाठी घरात बसा आणि संकटावर मात करा ! 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख