bawankule's strategy gives success to bjp | Sarkarnama

पालकमंत्री बावनकुळेंच्या रणनितीला यश

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 28 मे 2019

लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजप, शिवसेनेला नागपूरसह रामटेक, भंडारा-गोंदियामध्ये घवघवीत यश मिळाले. या तिन्ही मतदार संघाची जबाबदारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर होती. त्यांची रणनिती आणि नऊ
जाहीरसभा, 147 प्रचार बैठकांतून कार्यकर्त्यांना दिलेली उर्जा, यातून भाजपच्या विजयाचा मार्ग प्रशस्त झाला. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदारांनी नेत्रदीपक यश मिळवून दिले. विदर्भातही मतदारांचा कल महायुतीकडेच असल्याचे या निकालांनी सिद्ध केले. 

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजप, शिवसेनेला नागपूरसह रामटेक, भंडारा-गोंदियामध्ये घवघवीत यश मिळाले. या तिन्ही मतदार संघाची जबाबदारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर होती. त्यांची रणनिती आणि नऊ
जाहीरसभा, 147 प्रचार बैठकांतून कार्यकर्त्यांना दिलेली उर्जा, यातून भाजपच्या विजयाचा मार्ग प्रशस्त झाला. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदारांनी नेत्रदीपक यश मिळवून दिले. विदर्भातही मतदारांचा कल महायुतीकडेच असल्याचे या निकालांनी सिद्ध केले. 

विदर्भात प्रतिष्ठेची असलेली नागपूर, तसेच भंडारा-गोंदिया व रामटेक या तीन लोकसभा मतदारसंघाचे क्‍लस्टर प्रमुख म्हणून राज्याचे ऊर्जामंत्री व पालकमंत्री बावनकुळे यांच्याकडे जबाबदारी होती. त्यांच्या रणनितीमुळे या तीनही मतदारसंघातील भाजपा-सेना महायुतीचे उमेदवार विजयी झाले.

या तीनही मतदारसंघात पालकमंत्री बावनकुळे यांनी प्रचारात स्वत:ला झोकून दिले होते. त्यांनी 147 प्रचार बैठका, नऊ जाहीरसभा व कार्यर्त्यांचे, महिलांचे मेळावे घेऊन प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळली. 26 मार्च ते प्रचारसंपेपर्यंत अर्थात 9 एप्रिलपर्यंत पालकमंत्री बावनकुळे यांनी बैठक, जाहीर सभा, पक्ष कार्यालयांचे उद्‌घाटन, ग्रामीण भागात जनतेशी थेट संपर्क, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे व इतर मंत्र्यांच्या सभेचे नियोजन, त्याला उपस्थिती लावून तीनही मतदारसंघात सकाळी 8 ते रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार केला.

अत्यंत नियोजनबध्द प्रचाराचा कार्यक्रम त्यांनी या निवडणुकीत राबवून या तीनही जागा निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले.  26 मार्चला भंडाऱ्यात 9 बैठका घेत त्यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला. हा प्रचाराचा धडाका 9 एप्रिलपर्यंत कायम होता.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख