bawankule recognised his future in that meeting only... | Sarkarnama

बावनकुळेंना आपले भवितव्य `त्या बैठकीतच` कळाले होते...

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील तालेवार मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या समर्थकांना धक्का बसला आहे. मात्र आपले भवितव्य काय असणार, याची जाणीव बावनकुळे यांना आठवडाभरापूर्वीच झाली होती

भाजपचे उमेदवार ठरविण्यासाठी कोअर कमिटीची बैठक नवी दिल्लीत 29 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा झाली होती. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदी उपस्थित होते.

या बैठकीच्या वेळी बावनकुळे यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. बावनकुळे हे काही कोअर कमिटीचे सदस्य नव्हते. त्यामुळे त्यांना बैठकीत प्रवेश नव्हता.

उमेदवारांची यादी निश्चित झाल्यानंतर पंतप्रधान आणि अमित शहा हे दोघेच वेगळ्या खोलीत इतर चर्चा करण्यासाठी निघून गेले. त्यानंतर बावनकुळे यांना मुख्यमंत्री फडणवीस आणि राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष यांनी बोलावून घेतले आणि हे तिघे दुसऱ्या खोलीत चर्चा करण्यासाठी निघून गेले. या तिघांत चर्चा झाल्यानंतर बावनकुळे हे घामाघून होऊनच बाहेर आले होते. त्यांचा चेहरा पडला होता. तसेच ते अस्वस्थ दिसत होते. तेव्हाच काहीतरी बिनसल्याचा अंदाज इतरांना आला होता. फडणवीस त्यांना खूणेने शांत राहा, असे सांगत होते. पण या तिघांत काहीतरी झाल्याचे इतरांना कळाले होते. त्यामुळेच अतिशय नाराज होऊन बावनकुळे तेथून बाहेर पडले होते.

याची परिणती नंतरच्या तीन-चार दिवसांत दिसून आली. त्यांनी प्रत्येक यादीत आपल्या नावाची वाट पाहिली पण त्यांना उमेदवारी मिळाली नाहीच.

त्यांच्याऐवजी कामठी मतदारसंघातून माजी जिल्हा परिषद सदस्य टेकचंद सावरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेले दोन दिवस नागपुरात ते मुख्यमंत्र्यांसोबत लक्ष्मीनगरच्या हॉटेल अशोका, त्यानंतर रात्री दोन वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान रामगिरी आणि काल सकाळी पुन्हा रामगिरी अशा चर्चांच्या फैरी झडूनही बावनकुळेंना पक्षाने नारळ दिलाच.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख