bawankule minister | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

दारू दुकानांविरोधातील आंदोलनाने बावनकुळे त्रस्त

सरकारनामा ब्युरो
रविवार, 13 ऑगस्ट 2017

नाशिक : राष्ट्रीय महामार्गावरील दारुची दुकाने बंद करण्यात आली. त्यामुळे ही दुकाने वस्तीत स्थलांतरीत झाली. त्याविरोधात शहरात आंदोलन सुरु आहे. या मागणीला स्थानिक आमदारांनीही पाठींबा दिला. त्यांच्या सततच्या पाठपुराव्याने राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे त्रस्त झाले आहे. 

नाशिक : राष्ट्रीय महामार्गावरील दारुची दुकाने बंद करण्यात आली. त्यामुळे ही दुकाने वस्तीत स्थलांतरीत झाली. त्याविरोधात शहरात आंदोलन सुरु आहे. या मागणीला स्थानिक आमदारांनीही पाठींबा दिला. त्यांच्या सततच्या पाठपुराव्याने राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे त्रस्त झाले आहे. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून शासनाच्या तिजोरीत मोठा महसूल जमा होतो. त्यामुळे नियमांचे पालन करुन सुरु असलेल्या दारु दुकानांना संरक्षण देण्याचे सरकारचे धोरण आहे. शहरात तीन दुकानांविरोधात स्थानिक महिलांचे आंदोलन सुरु आहे. याबाबत दोन महिन्यांपूर्वी राज्य उत्पादनशुल्क मंत्री नाशिकला आले असता त्यांना निवेदन देण्यात आले. तत्पूर्वी जिल्हाधिकारी व अन्य यंत्रणांनाही निवेदन दिले होते. 

हे दुकान लिकर शॉप नियमांचे पालन करुन व्यवसायिक जागेत सुरु असल्याने बंद करता येणार नाही अशी भूमिका अधिका-यांनी घेतली होती. मंत्री बावनकुळे यांनीही तीच भूमिका कायम ठेवली. मात्र आंदोलन सुरुच राहिल्याने अखेर भाजपच्या स्थानिक आमदार देवयानी फरांदे यांनाही आंदोलनकर्त्यांची बाजू घ्यावी लागले. त्यात आता भाजपचे नगरसेवकही उतरले आहेत. त्यामुळे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. या पाठपुराव्याने मंत्री त्रस्त झाले आहेत. 

सरकारचे धोरण व स्थानिक आमदार, नागरिकांचे आंदोलन या कात्रीत मंत्री सापडले आहेत. आता त्यांनी चार्वाक चौक आणि टागोरनगर येथील दुकानांबाबत महिलांचे मतदान घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र दुकाने बंद झाल्यास शासनाचे महसूल बुडतो. बंद झाले नाही तर स्थानिक आमदारांचा दबाव येतो. त्यात काय करावे असा प्रश्न राज्य उत्पादन शुल्क मंत्री बावनकुळे यांना पडला आहे. ही दुकाने बंद पडल्यास शहरातील अन्य दुकानांबाबतही आंदोलन उभे राहू शकते असा अहवाल व भिती पोलिसांना वाटत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख