bawankule may get opportunity in legislative council... | Sarkarnama

बावनकुळे यांच्या कारकिर्दीचा उडालेला `फ्यूज` दुरूस्त होणार...

उमेश घोंगडे
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

....

पुणे : माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राजकीय कारकिर्दीचा विधानसभा निवडणुकीत उडालेला फ्यूज दुरूस्त होण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी विधानसभा निवडणुकीत बावनकुळे यांचे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारली. हे धोरण लवकरच दुरूस्त होण्याची शक्यता आहे. 

राज्यात विधान परिषदेच्या काही जागा पुढील महिन्यात रिक्त होत आहेत. या जागा भरताना भाजपमधील नाराज नेत्यांना संधी देण्याचे पक्षाचे धोरण आहे. बावनकुळे यांना तिकिट नारारल्यामुळे पूर्व विदर्भात काही जागांवर फटका बसल्याची उघड कबुली भाजपचे नेते देत आहेत. एवढेच नाहीत तर पंकजा मुंडे यांच्या परळी या मतदारसंघातील तेली समाजाने भाजपच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे मुंडे यांच्या पराभवाला ते एक कारण मानण्यात येत आहे. त्यामुळे बावनकुळे यांना विधान परिषदेवर संधी देण्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपला चार जणांना विधान परिषदेवर पाठविण्याची संधी येऊ शकते. त्यात पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील आणि बावनकुळे यांचे नाव आघाडीवर आहे. बावनकुळे यांच्या नावाची प्रदेशाध्यक्ष पदासाठी देखील चर्चा होती. मात्र तेथे आता चंद्रकांत पाटील यांच्यावर जबाबदारी आल्याने ओबीसी नेत्यांना इतरत्र नेमण्याचे धोरण आखले आहे. त्यात बावनकुळे यांना सोबत घेऊन पूर्व विदर्भातील नाराज मतदार पुन्हा आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख