पालकमंत्री बावनकुळेंच्या गावात भाजपचा नगराध्यक्ष उमेदवार केवळ 280 मतांनी विजयी

नागपूर जिल्ह्यातील महादुला येथील नगराध्यक्षपदी राजेश रंगारी केवळ 280 मतांनी विजयी झाले. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे गाव असलेल्या महादुला येथे भाजपचा उमेदवार निसटत्या मताधिक्‍याने विजयी झाल्याने बावनकुळे यांच्या वर्चस्वाला धक्का मानला जात आहे.
पालकमंत्री बावनकुळेंच्या गावात भाजपचा नगराध्यक्ष उमेदवार केवळ 280 मतांनी विजयी

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील महादुला येथील नगराध्यक्षपदी राजेश रंगारी केवळ 280 मतांनी विजयी झाले. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे गाव असलेल्या महादुला येथे भाजपचा उमेदवार निसटत्या मताधिक्‍याने विजयी झाल्याने बावनकुळे यांच्या वर्चस्वाला धक्का मानला जात आहे.

महादुला नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी 27 जानेवारीला मतदान झाले होते. महादुलाच्या नगराध्यक्षपदी भाजपचे राजेश रंगारी निवडून आले आहेत. त्यांनी कॉंग्रेसचे रत्नदीप रंगारी यांचा पराभव केला. 

महादुला हे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे गाव असल्याने येथील भाजपचा उमेदवाराचा एकतर्फी विजय संपादन करेल, असा कयास होता. परंतु प्रत्यक्षात कॉंग्रेसचे रत्नदीप रंगारी यांनी चांगलीच लढत दिली. काही फेऱ्यांमध्ये तर भाजपचे उमेदवार पिछाडीवर होते. त्यावेळी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह पसरला होता व भाजपच्या गोटात शांतता पसरली होती. परंतु अखेरच्या फेरीत भाजपचे राजेश रंगारी यांनी आघाडी घेतली व केवळ 280 मतांनी ते विजयी झाल्याचे घोषित झाले. 
भाजपच्या उमेदवाराचा इतक्‍या कमी फरकाने विजय झाल्याने भाजपचे नेते व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकहाती प्रभाव राहिलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बावनकुळे यांना स्वतःच्या गावातच भाजपच्या उमेदवाराला चांगल्या मताधिक्‍याने विजयी करता आले नाही, याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

महादुला येथील 17 सदस्यीय सदस्यांच्या नगरपंचायतमध्ये भाजपचे 11 सदस्य निवडून आले आहेत. कॉंग्रेसचे 4 जण, बसपा व अपक्ष प्रत्येकी एक सदस्य विजयी झाला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com