लढाई तीन साखर सम्राटांची !

sugar-barons-
sugar-barons-

मंगळवेढा :   निवडणुकीचा तापलेला आखाडा आज थंड होणार असला तरी या आखाड्यात खरी लढत ही तीन साखर कारखान्याच्या अध्यक्षात होत असल्याने या लढतीत कोणता अध्यक्ष बाजी मारणार याची चर्चा  मतदारसंघात चर्चा सुरू झाली.


या निवडणुकीत दोन्ही  तालुक्यातील  बेरोजगारी,शेतीच्या पाण्याचा प्रश्न,स्मारक, व इतर प्रश्नावर चर्चा न होता खालच्या पातळीवर विद्यमान दोन आमदारांचे आरोप प्रत्यारोप झाले.   शहर व ग्रामीण भागात झालेले गट बदल याची चर्चा या निवडणूकीत अधिक झाली. शिवाय माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचे हलगी वंदन आणि नृत्य गाजले.  ढोबळेंवर अजित पवारांनी केलेली नाच्या म्हणून टीकाही चर्चेत राहिली . 


यामध्ये पांडुरंग कारखान्याचे अध्यक्ष असलेले सुधाकरपंत परिचारक हे  रयत क्रांती संघटनेकडून उभे असले तरी चिन्ह मात्र भाजपाचे कमळ घेतले आहे. तर गत निवडणुकीत हातावर  लढलेले आ.भारत भालके  यांनी हातात घड्याळ घेतले आहे. तिसरे उमेदवार दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे हे अपक्ष उमेदवार अपक्ष असून चिन्ह शेतकऱ्यांचे ट्रॅक्‍टर असून या विधानसभेच्या आखाड्यात ट्रॅक्टरच्या मशागतीच  अधिक चर्चा सुरू झाली.


 विधानसभेच्या आखाड्यात आ परिचारकाकडून कारखानदारी व दराचा मुद्दा उपस्थित केला. केंद्र व राज्य सरकारच्या कामाची माहिती देत कौल मागितला.  भालकेनी  सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा मतदारसंघातील रखडलेल्या प्रश्नावर आरोप केले .  भालकेंच्या   प्रचारासाठी  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ,अजित पवार ,खा.अमोल कोल्हे, रूपाली चाकणकर, धनंजय मुंढे, सुषमा आंधारे असे वक्ते आले . त्यांनी  सत्ताधारी पक्षावर प्रहार केला. नेत्याऐवजी सभेत नागरिकांची उपस्थिती व लोकवर्गणीची चर्चा लोकांत झाली. 


सुधाकरपंत परिचारक यांच्यासाठी प्रशांत परिचारक यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मंत्री  रामदास आठवले, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून मोठे  शक्ती प्रदर्शन झाले . उमेदवारी रयत क्रांती पक्षाची जरी असली तरी उमेदवारी मुख्यमंत्र्यांनी दिली असे समजून त्यांच्या समर्थकांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. निस्पृह व निष्कलंक ही प्रतिमा लोकांत अधिक रूढ केली गेली. 


 अशा परिस्थितीत अध्यक्ष समाधान आवताडे अपक्ष असून ते सध्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बळावर सध्याच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांच्याकडे प्रभावी वक्ता नाही त्यामुळे ते स्वतः स्टार प्रचारक आहेत.  त्यामुळे ते एक हाती प्रचार यंत्रणा राबवत आहेत . सक्षम यंत्रणा व सोशल मिडीयाचा  पुरेपूर वापर त्यांनी केला.  पंढरपूर व मंगळवेढा येथे रॅलीच्या माध्यमातून मोठे शक्तीप्रदर्शन करत मोठे आव्हान उभे केले. पण त्यानी प्रतिस्पर्ध्यावर टीका करणे टाळले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com