Battle intensifies among Pankaja and Dhanajay Munde in Parali | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

चवथ्या फेरीत आदित्य ठाकरे 19954 मतांनी आघाडीवर....
दौंड (पुणे) मध्ये आमदार राहुल कुल ६३३९ मतांनी आघाडीवर
दहाव्या फेरीअखेर धनंजय मुंडे 13 हजार मतांनी आघाडीवर
साताऱ्यातून उदयनराजे 32 हजार मतांनी पिछाडीवर
रोहित पवार आठव्या फेरीअखेर 12170 मतांनी आघाडीवर
येवला मतदारसंघ- छगन भुजबळ ३४७२ मतांनी आघाडी
मालेगाव बाह्य - शिवसेनेचे दादा भुसे 21 हजार 913 मतांनी आघाडीवर.
कुलाबा मतदार संघात भाजप चे राहुल नार्वेकर 7 हजार मतांनी आघाडीवर
चिंचवड - भाजपचे लक्ष्मण जगताप 7785 मताने आघाडीवर.
तिसऱ्या फेरीत शिवसेनेचे आदित्य ठाकरे 16 हजार मतांनी आघाडीवर
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ उदयनराजे भोसले दुसऱ्या फेरीत 10500 हजार मतांनी पिछाडीवर
सावंतवाडी शिवसेनेनेचे दीपक केसरकर दुसऱ्या फेरीत 703 मतांनी आघाडीवर
कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 1200 मतांनी आघाडीवर
सातारा : सातारा विधानसभा भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर
भोकर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आघाडीवर
भुसावळला पहिल्या फेरीत भाजपचे आमदार संजय सावकारे यांना 3960 मतांची आघाडी.
इंदापूर हर्षवर्धन पाटील 1000 मतांनी आघाडीवर
राज्यात मतमोजणीला सुरुवात

परळीत पंकजा मुंडे - धनंजय मुंडे यांच्यात आरपारची लढाई सुरु आहे 

दत्ता देशमुख
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात सध्या काट्याची टक्कर सुरु आहे. फोडाफोडी, मेळावे, बैठका, फेऱ्यांवर सध्या मतदार संघात जोर आहे.

बीड : दिंवगत लोकनेते गोपीनाथराव मुंडेंमुळे ओळख निर्माण झालेला परळी मतदार संघात सध्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात निकराची लढाई सुरु आहे.

या मुंडे भावंडांमुळे राज्यात या निवडणुकीची चर्चा तर मतदार संघात मात्र दोघांत चुरस आहे. सार्वजनिक ठिकाणी जिंकण्याचा विश्वास दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते करत असले तरी काही गडबड होण्याची भीतीही आहे.

Image result for Gopinath munde facebook

जुना रेणापूर आणि आताचा परळी हा दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी प्रतिनिधित्व केलेला मतदार संघ आहे. दिवंगत मुंडेंनी सुरुवातीला राज्यात आणि नंतर देशात नेतृत्व केल्याने या मतदार संघाची सर्वत्र ओळख निर्माण झाली.

पाच वेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या दिवंगत मुंडेंना येथून दोन वेळा पराभव पत्करावा लागला. २००९ साली दिवंगत मुंडेंनी राष्ट्रीय राजकारणात संधी मिळाल्यानंतर लोकसभा लढविली आणि येथून पहिली विधानसभा पंकजा मुंडेंनी लढविली आणि जिंकलीही. 

परंतु, तेव्हापासूनच मुंडे घराण्यात राजकीय कुरबुर सुरु होऊन २०१२ मध्ये त्याचे धनंजय मुंडेंच्या बंडात रुपांतर झाले. जिल्हा परिषदेचे दोन वेळा सभापती, उपाध्यक्ष राहील्याने पुढचा टप्पा म्हणून उमेदवारी मिळावी अशी धनंजय मुंडेंना अपेक्षा होती. परंतु, पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळाल्याने त्यांचे समर्थक अस्वस्थ झाले. दरम्यान, बंड केलेल्या धनंजय मुंडेंनी २०१४ मध्ये पंकजा मुंडेंच्या विरोधात निवडणुक लढविली परंतु त्यांना पराभवाचे तोंड पहावे लागले.

 मात्र, या निवडणुकीतील विजयी झालेल्या पंकजा मुंडेंना भाजपमध्ये मानाचे स्थान आणि मंत्रीमंडळात वजनदार खात्यासह जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले. तर, पराभव होऊनही राष्ट्रवादीने त्यांच्याकडील दोन प्रमुख पदांपैकी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद धनंजय मुंडे यांना दिले. तेव्हापासून त्यांनीही मतदार संघात जोरदार बांधणी केली. तर, पंकजा मुंडेंनीही विकास कामांत परळीसाठी कायम ढळता हात सोडला. 

मात्र, मागच्या काळात झालेल्या जिल्हा परिषद - पंचायत समिती, नगर पालिका, बाजार समिती या निवडणुकांत राष्ट्रवादीला एकतर्फी यश मिळवून देत धनंजय मुंडे यांनी भाजपला चांगलीच धोबीपछाड दिली. परंतु, लोकसभा निवडणुकीत मतदार संघातून लिड मिळवून पंकजा मुंडे यांनीही एकाच दणक्यात याची परतफेड केली. त्यामुळे मतदार संघ कोणासाठी अनुकूल आहे हे कळायला मार्ग नाही. 

Image result for rajshri dhanajay munde facebook
आता दुसऱ्यांदा पंकजा मुंडे व धनंजय मुंडे ही भावंडे समोरा - समोर आले आहेत. दोघांच्याही राजकीय वाटचालीतील वळणदार टप्प्यावरील ही निवडणुक असल्याने त्यांच्यासाठीही ‘करो या मरो’अशीच वेळ आहे. त्यादृष्टीने दोघांनीही मतदार संघात जोर लावला आहे. पहिल्या टप्प्यातील शक्ती प्रदर्शर्नात दोघांनीही ‘हम भी कम नही’ हे दाखवून दिले. तर, फोडाफोडीतही हेच चित्र राहीले. पंकजा मुंडे ह्या विविध समाज आणि संघटनांचे मेळावे घेत आहेत. 

तर, बहिण प्रितम मुंडे देखील मेळावे, कॉर्नर बैठका घेत आहेत. आई प्रज्ञा मुंडे व दुसऱ्या बहिण यशश्री मुंडे यांचाही घरभेटींवर भर आहे. तिकडे धनंजय मुंडे यांनीही प्रचार फेऱ्या, बुथ प्रमुखांचे मेळावे, कॉर्नर बैठकांचा जोर लावला आहे. त्यांच्यासाठी सौभाग्यवती राजश्री मुंडेंच्याही कॉर्नर बैठका, सभा, घरभेटी सुरु आहेत.

Image result for pritam munde facebook

दोघांच्याही वॉर रुम सोशल मिडीयावरील प्रचारासाठी सज्ज असून आरोप - प्रत्यारोप करणारे पोस्टर्स, व्हिडीओंनीही मतदार संघात धुमाकूळ घातला आहे. प्रचारात या दोघांच्या स्वत:च्या प्रचारासह विरोधकांच्या उणिवांचे सोशल मिडीयातून प्रसारित होणारे व्हिडीओ चर्चेचे ठरत आहेत. एकूणच सर्व मार्गाने दोघांनीही जोर लावला असला तरी निकाल काय ते २४ तारखेलाच कळणार आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख