विचारांच्या लढाईत कॉंग्रेसला खंबीर साथ द्या - बसवराज पाटील

विचारांच्या लढाईत कॉंग्रेसला खंबीर साथ द्या - बसवराज पाटील

उमरगा : कॉंग्रेसच्या नेतृत्वाने राज्यातील सर्व जातीधर्माला सोबत घेऊन राजकारण व समाजकारण केले. भाजप - शिवसेनेचा पाच वर्षाचा कार्यकाळ मात्र अंधकारमय होता. ही निवडणूक म्हणजे विचाराची लढाई आहे, यात कॉंग्रेस पक्षाला खंबीर साथ देऊन उमेदवाराची जात धर्म न पाहता निरपेक्ष भावनेने दिलीप भालेराव यांना प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीचे कार्याध्यक्ष,औश्‍याचे आमदार बसवराज पाटील यांनी केले. 

उमरगा-लोहारा विधानसभा निवडणूकीतील कॉंग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्षाचे उमेदवार दिलीप भालेराव यांच्या प्रचारार्थ लोहारा येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बसवराज पाटील म्हणाले, कॉंग्रेस पक्षाने सत्तर वर्षात काय केले असा सवाल भाजपाचे नेतेमंडळी करताहेत. कॉंग्रेस पक्षाचे देशाच्या स्वातंत्रलढ्यासाठी योगदान राहिले आहे हे विसरून चालणार नाही. कॉंग्रेसच्या नेतृत्वाने गेल्या 65 वर्षात लोकहिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. 

पंचायत राज संस्था, सहकारी संस्था मजबूत करणे, महिला आरक्षण, गरिबांसाठी अन्नसूरक्षा योजना आदी महत्वाचे निर्णय घेतले. गेल्या विधानसभा निवडणूकीत लोकांनी सत्ता बदल केला, मात्र पाच वर्षाच्या काळात लोकांच्या पदरात केवळ आश्वासनाशिवाय काहीच पडले नाही. शेतकऱ्यांचे कर्ज माफ होऊ शकले नाही. लोकांची दिशाभूल करुन पून्हा सत्ता मिळविण्यासाठी भाजप - शिवसेनेच्या मंडळींचा प्रयत्न सुरू आहे. 

दहा वर्षाच्या काळात शिवसेनेच्या लोकप्रतिनिधीने विकासाची कामे केली नाहीत. उमरगा-लोहारा तालुक्‍यात कॉंग्रेसने अनेक लोकहिताचे कामे केली आहेत, यापुढेही कॉंग्रेस पक्ष सर्वांना सोबत घेऊन विकासाची कामे करण्यासाठी कटिबद्ध आहे. लोहारा तालुक्‍यातील विविध प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी मतदारांनी जागरूक राहुन कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार दिलीप भालेराव यांना भरभरून साथ द्यावी असे आवाहन आमदार पाटील यांनी केले. यावेळी आपण प्रामाणिकपणे काम करण्याचा शब्द देतो, आपले मतदान रुपी आशीर्वाद मला राहू द्या असे आवाहन उमेदवार दिलीप भालेराव यांनी उपस्थितांना केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com