माझे मुळ कुटुंब वैरागचेच; दिलीप सोपल यांचे भावनिक आवाहन

''शिवसेना प्रवेशाचा माझा निर्णय सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून व बैठका घेऊन घेतलेला आहे. अफवा पसरविणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका. पुढचे सरकार शिवसेना-भाजप युतीचेच येणार आहे. त्यामुळे विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी वैरागकरांनी पुन्हा निवडून द्यावे. माझे मूळ कुटुंब वैरागचेच आहे,'' असे भावनिक आवाहन दिलीप सोपल यांनी येथे केले.
Dilip Sopal Shivsena.
Dilip Sopal Shivsena.

वैराग (ता. बार्शी) : ''शिवसेना प्रवेशाचा माझा निर्णय सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून व बैठका घेऊन घेतलेला आहे. अफवा पसरविणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका. पुढचे सरकार शिवसेना-भाजप युतीचेच येणार आहे. त्यामुळे विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी वैरागकरांनी पुन्हा निवडून द्यावे. माझे मूळ कुटुंब वैरागचेच आहे,'' असे भावनिक आवाहन दिलीप सोपल यांनी येथे केले.

वैराग (ता. बार्शी) येथील इंदिरानगरच्या प्रभाग क्रमांक दोन येथे आयोजित सहविचार बैठकीवेळी दिलीप सोपल बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना शहरप्रमुख संतोष गणेचारी होते. प्रारंभी विघ्नहर्ता गणेश मंडळाऱ्या श्रीगणेशाची पूजा, आरती करून विधानसभा प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी बार्शी तालुका शिवसेनाप्रमुख अमोल काकडे, वैराग ग्रामपंचायत सदस्य अरुण सावंत, सुनील धोकटे, कुमार साखरे, सुभाष शेळके, अनिल सावंत, समाधान पवार, सिद्धू इटकर, अमोल अंधारे, आदिनाथ अहिरे, शिवराम दिंडोरे, कल्पना बडेकर, आदी उपस्थित होते.

सोपल म्हणाले की, वैरागची नवीन पाणीपुरवठा योजना, 220 के. व्ही. विद्युत उपकेंद्र, तीर्थक्षेत्र विकास योजना, सिमेंटचे रस्ते अशी अनेक कामे केली आहे. पुढेही विकासाची गंगा चालू ठेवणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com