एकनाथ शिंदे यांचा राष्ट्रवादीला ठाण्यात दे धक्का! आव्हाड उरले पक्षाचे एकमेव आमदार

एकनाथ शिंदे यांचा राष्ट्रवादीला ठाण्यात दे धक्का! आव्हाड उरले पक्षाचे एकमेव आमदार

पुणे : ठाण्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीला आज धक्का दिला. ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आपल्या पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आज दिला. 

बरोरा कुटुंह हे 1980 पासून शरद पवार यांच्यासोबत होते. आगामी विधानसभा निवडणुकीत बरेरा हे शिवसेनेचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या जवळकीमुळे त्यांचा शिवसेनेत प्रवेश लवकरच होणार असल्याचे सांगण्यात आले. बरोरा हे विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा देताना खुद्द शिंदे या वेळी उपस्थित होते. 

ठाणे जिल्हा हा या आधी समाजवाद्यांचा बालेकिल्ला होता. त्यानंतर शिवसेनेने ठाणे शहरावर वर्चस्व निर्माण केले. ग्रामीण भागात मात्र राष्ट्रवादीने प्रस्थ निर्माण केले होते. जिल्हा बॅंक, जिल्हा परिषद, ग्रामीण सोसायट्या येथे राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. आता ग्रामीण भागातही शिवसेनेने राष्ट्रवादीला धोबीपछाड दिले आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात आता जितेंद्र आव्हाड हे एकमेव आमदार आता राष्ट्रवादीकडे राहिले आहेत. राष्ट्रवादीने 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी ठाण्याचे शिवसेना आमदार आनंद परांजपे यांना पक्षात घेऊन सेनेला दणका दिला होता. सेनेने आता वर्तुळ पूर्ण केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com