Barne will get 25 Thousand Lead from Maval say Bala Bhegde | Sarkarnama

मावळ विधानसभा मतदारसंघातून बारणेंना २५ हजाराचे लीड देणार : बाळा भेगडे

उत्तम कुटे
गुरुवार, 16 मे 2019

शिवसेनेचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे एक लाखाच्या लीडने निवडून येणार असल्याचा दावा मावळचे भाजप आमदार आणि पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय ऊर्फ बाळा भेगडे यांनी आज 'सरकारनामा'शी बोलताना केला. आपल्या मावळ विधानसभा मतदारसंघातून त्यांना २५  हजाराचे मताधिक्य देणार असल्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

पिंपरी : शिवसेनेचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे एक लाखाच्या लीडने निवडून येणार असल्याचा दावा मावळचे भाजप आमदार आणि पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय ऊर्फ बाळा भेगडे यांनी आज 'सरकारनामा'शी बोलताना केला. आपल्या मावळ विधानसभा मतदारसंघातून त्यांना २५  हजाराचे मताधिक्य देणार असल्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

बारणेंना मत म्हणजे मोदींना मत, हे कार्यकर्त्यांमार्फत मतदारांना बिंबविण्यात यशस्वी झाल्यामुळे बारणे निवडून येणार असल्याचा दावा भेगडेंनी केला. तसा संदेश पोचविण्यात आम्ही य़शस्वी झालो, असे ते म्हणाले. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्य़ांनी ही निवडणूक स्वताच्या हातातच नाही,तर खांद्यावर घेतली होती.त्यामुळेच विजयी होण्याचा विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले. 

मावळ विधानसभा मतदारसंघातून भेगडे हे दोनदा निवडून आले आहेत. राष्ट्रवादीतील फाटाफुटीचा त्यांना दरवेळी फायदा झालेला आहे.त्यातून हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला बनला आहे.गत लोकसभेला या मतदारसंघाने शिवसेना उमेदवाराला 41 हजार 381 मतांचे लीड दिले होते. त्यावेळीही म्हणजे २०१४ ला बारणे हेच उमेदवार होते. मात्र, यावेळी अजित पवारांचा मुलगा पार्थ राष्ट्रवादीचा उमेदवार आहे. त्यामुळे मावळमधील पक्षातील गटबाजी कधी नाही,ती संपली आहे. तरीही मतदारांवर पूर्ण विश्वास असल्याने बारणेंनाच लीड मिळेल, असे भेगडे म्हणाले.शिवाय भाजप,शिवसेना व आरपीआयने प्रामाणिकपणे काम केल्यानेही हा विजय मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख