Baramati will Celebrate Ajit Pawars Deputy Chief Minster Post | Sarkarnama

अजितदादांचे उपमुख्यमंत्रीपद बारामती करणार 'सेलिब्रेट'

मिलिंद संगई
सोमवार, 30 डिसेंबर 2019

गेल्या अनेक दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतर भाजपवर मात करत राष्ट्रवादी- शिवसेना व कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर आले आणि बारामतीचे लोकप्रतिनिधी असलेले अजित पवार उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान होत आहेत, याचा आनंद आज कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पुन्हा...या गाण्याची धून लावून धडाक्यात साजरा केला. 

बारामती : अजित पवार यांचे नाव अधिकृतपणे उपमुख्यमंत्रीपदासाठी घोषित झाल्यानंतर आज बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शपथविधी होताच शहरात जल्लोष करण्याची जोरदार तयारी केली असून राष्ट्रवादी भवनासह विविध चौकात फटाक्यांची आतषबाजी करीत कार्यकर्ते जल्लोष करणार आहेत.

दरम्यान अनेक संस्थांच्या पदाधिका-यांसह अनेक कार्यकर्त्यांनीही पहाटेच मुंबईकडे प्रयाण केले आहे.  शपथविधीला पास नाही मिळाला तरी शपथविधीनंतर अजित पवार यांचे वैयक्तिक अभिनंदन करुनच परत यायचे अशा तयारीने कार्यकर्ते मुंबईला गेलेले आहेत. 

दुसरीकडे बारामतीत अजित पवार यांचा भव्य नागरी सत्कार करण्याचीही तयारी आज सुरु झाली असून शक्य तितक्या लवकर हा नागरी सत्कार सोहळा पार पाडण्याचे नियोजन राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांकडून सुरु झाल्याचीही माहिती मिळाली आहे. 

राष्ट्रवादी पुन्हा....

गेल्या अनेक दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतर भाजपवर मात करत राष्ट्रवादी- शिवसेना व कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर आले आणि बारामतीचे लोकप्रतिनिधी असलेले अजित पवार उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान होत आहेत, याचा आनंद आज कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पुन्हा...या गाण्याची धून लावून धडाक्यात साजरा केला. 

विकासकामांना मिळेल गती....

अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर केवळ बारामती मतदारसंघच नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक विकासकामांना गती मिळेल व निर्धारीत वेळेत विकासकामे पूर्ण होतील. अडचणींवर मात करुन काम पूर्ण करण्याची अजित पवार यांची हातोटी आहे, त्याचा फायदा सर्वांनाच होईल- संभाजी होळकर, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, बारामती...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख