निवडणुकीमुळे बारामतीची बससेवा ठप्प

निवडणुकीच्या धामधुमीमुळे बारामतीतील राज्य परिवहन मंडळाच्या बससेवेचे वेळापत्रक पार कोलमडले असून त्याचा फटका प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागत आहे. मंगळवारपर्यत (ता. 22) ही स्थिती कायम राहणार असल्याचे आज सांगितले गेले.
Maharashtra State Transport Bus
Maharashtra State Transport Bus

बारामती : निवडणुकीच्या धामधुमीमुळे बारामतीतील राज्य परिवहन मंडळाच्या बससेवेचे वेळापत्रक पार कोलमडले असून त्याचा फटका प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागत आहे. मंगळवारपर्यत (ता. 22) ही स्थिती कायम राहणार असल्याचे आज सांगितले गेले. 

निवडणुकीच्या कामासाठी बारामती आगाराच्या 84 बसेसपैकी तब्बल 77 बसेस अधिग्रहीत करण्यात आलेल्या असल्याने केवळ चार बसेसवर बारामती आगार आज काम करीत असल्याचे चित्र बघायला मिळाले. बारामती आगाराच्या 54 गाड्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी तर 23 गाड्या सासवड येथे पाठविण्यात आल्याने आज बारामती बसस्थानकावरील गाड्यांचे वेळापत्रक पार कोलमडून गेले. मुंबई व हैदराबाद या लांब पल्ल्याच्या गाड्यांचा अपवाद वगळता इतर सर्व गाड्या रद्द केल्याची माहिती आगारप्रमुख अमोल गोंजारी यांनी दिली. 

ग्रामीण भागात जाणा-या सर्वच गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. निवडणूकीची ईव्हीएम, व्हीव्ही पॅट मशीन्स व इतर यंत्रणा प्रत्येक मतदान केंद्रावर पोहोचविण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसेसचाच वापर दरवेळेस केला जातो. यंदाही तब्बल 77 बसेस या कामासाठी लावण्यात आल्याने ऐनवेळेस प्रवासाचा बेत करुन आलेल्या प्रवाशांना प्रवास रद्द करुन घरी जावे लागले. मतदान केंद्राची मोठी संख्या विचारात घेता इतक्या गाड्यांची आवश्यकता भासते, त्या मुळे या बसेस अधिग्रहीत करण्याशिवाय पर्यायच नसल्याचे अधिका-यांनी नमूद केले. 

दरम्यान मतदान संपल्यावर बस गाड्या आगारात येऊन वेळापत्रक सुरळीत होण्यासाठी मंगळवारी दुपारी एक वाजेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. बारामती आगारातील जवळपास सर्वच कर्मचारी निवडणुकीच्याच कामासाठी नियुक्त असून त्याचाही परिणाम बस सेवेवर झाला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com