...अन् बारामतीकरांना धक्काच बसला!

आज सकाळी राष्ट्रवादीच्या सर्वच कार्यकर्त्यांचे फोन सतत एंगेज्ड होते महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न सर्व कार्यकर्त्यांना पडत होता. एकीकडे शरद पवार यांची मान्यता नाही अशा बातम्या झळकत होत्या तर दुसरीकडे अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना दाखवत होते. त्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा संभ्रम होता.
Ajit Pawar New Deputy CM of Maharashtra
Ajit Pawar New Deputy CM of Maharashtra

बारामती शहर  : राज्याचे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी शपथ घेतल्याच्या ब्रेकिंग न्यूज पाहिल्यानंतर आज बारामतीकरांना धक्काच बसला. कालपर्यंत शिवसेना काँग्रेस सोबत सरकार बनवून अजित पवार उपमुख्यमंत्री होणार याची खात्री बारामतीकरांना होती. मात्र, आज सकाळी भाजपला पाठिंबा देत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ही ब्रेकिंग न्यूज पाहिल्याने बारामतीकरांना धक्काच बसला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तर नेमके काय सुरू आहे हे समजेनासे झाले होते. अनेक कार्यकर्त्यांनी एकमेकांना फोन करून या बातमीची खातरजमा करून घेतली. दुसरीकडे भाजपच्या उत्साही कार्यकर्त्यांनी मात्र फटाक्‍यांची आतषबाजी करत आपला आनंद व्यक्त केला.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आनंद व्यक्त करावा की दुःख व्यक्त करावं हेच समजेनासे झाले होते. एकीकडे अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याचा आनंद त्यांना होता मात्र या सर्व प्रकरणांमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भूमिका काय हे समजत नसल्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील संभ्रमात होते. 

आज सकाळी राष्ट्रवादीच्या सर्वच कार्यकर्त्यांचे फोन सतत एंगेज्ड होते महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न सर्व कार्यकर्त्यांना पडत होता. एकीकडे शरद पवार यांची मान्यता नाही अशा बातम्या झळकत होत्या तर दुसरीकडे अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना दाखवत होते. त्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा संभ्रम होता. याप्रसंगी नेमकी काय भूमिका घ्यायची हेच कार्यकर्त्यांना समजेनासे झाले होते त्यामुळे कार्यकर्ते देखील शांत होते थोडी वाट पाहूया आणि नंतर याबाबत बोलू असे कार्यकर्ते म्हणत होते.

दुसरीकडे अजित पवार यांनी हा निर्णय विचारपूर्वक घेतला असेल, या निर्णयामागे राज्यातील जनतेचे हित असेल. त्यादृष्टीनेच हा मार्ग त्यांनी निवडला असेल असेही कार्यकर्त्यांनी सांगितले . राष्ट्रवादीकडे संख्याबळाचा विचार केला तर 54 आमदार होते , त्यामुळे राष्ट्रवादीच्या वाट्याला चांगली मंत्रीपद येणे अपेक्षित होते. त्यामुळे अजित पवारांचा हा निर्णय हा निश्चित विचारपूर्वक घेतलेला असेल, असे काही जेष्ठ कार्यकर्त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com