bapat`s batting in front of Modi | Sarkarnama

आपण निधी देणे आणि आम्ही विकास करणे : मोदींसमोर बापटांची चारोळी

अमोल कविटकर
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

पुणे : "हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा प्रस्ताव मंजुरीसाठी दिल्यानंतर तो अवघ्या पंधरा दिवसांत मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला आणि आता प्रत्यक्ष कामालाही सुरुवात होते आहे. केंद्र आणि राज्याकडून आजवर पुण्याला ७० हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला असून नरेंद्रजी-देवेंद्रजी, पुणे तिथे 'नो' उणे, आपण निधी देणे, आम्ही विकास करणे" अशा शब्दांत पालकमंत्री गिरीश बापट यांनी मोदी-फडणवीसांसमोर `बॅटिंग` केली.

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री बापटांनी प्रास्ताविक करत राज्य आणि केंद्राने दिलेल्या निधीचा आढावा घेतला.

भाषणात बापट म्हणाले, "मेट्रोच्या पहिल्या टप्प्यावेळी व्यासपीठावर आमचे महापौर नव्हते, मात्र आता दोन्ही महापौर आमचे आहेत. या नव्या मेट्रो मार्गामुळे आता हिंजवडीमध्ये वीस मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे. लोकसंख्या वाढ आणि सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो पुढे हडपसरपर्यंत नेण्यात येणार आहे".

"पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ५७४० आणि पिंपरी-चिंचवड ६ हजार आणि पीएमआरडीएमार्फत ३० हजार घरे, असे एकूण ४१ हजार कुटूंबियांना आगामी काळात हक्काचे घर मिळणार आहे", असेही बापट म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख