bapat pressurized for fir against me : Dhangekar | Sarkarnama

पालकमंत्री बापटांच्या दबावानेच माझ्याविरोधात गुन्हा : रवींद्र धंगेकर

अमोल कविटकर
बुधवार, 15 मे 2019

पुणे : 'पालकमंत्री गिरीश बापट यांच्या दबावामुळेच माझ्याविरोधात मारहाणीची तक्रार दाखल झाली असून बापट हे सुडाचे राजकारण  करीत आहे', असा आरोप काँग्रेसचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. 

महापालिका शिपायाला मारहाण केल्याच्या आरोपावरून धंगेकर यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर धंगेकर यांनी स्वतः महापालिकेतून या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आणले आहे. त्या सीसीटीव्ही फुटेजनुसार धंगेकर यांनी संबंधित कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे दिसत नाही. याच आधारराव धंगेकर यांनी पालकमंत्री बापट यांच्यावर आरोप केले आहेत.

पालकमंत्री बापट यांच्या दबावानेच तक्रार झाल्याचा आरोप करत धंगेकर म्हणाले, 'राजकीय हेतूने माझ्यावर तक्रार दाखल केल्या जात असून मला जाणीवपूर्वक अडकवण्याचा डाव आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला राजकीयदृष्टया संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे.``

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख