Banners About Uddhav Thakrey Placed outside Matoshree | Sarkarnama

का आली 'मातोश्री'वर 'उद्धव मुख्यमंत्री...' असे बॅनर लावण्याची वे

रामनाथ दवणे
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

गेली पाच वर्षे भाजप सेना सत्तेत असतांना सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी मंत्री पदावर कारभार केला. त्यांना ही मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पडू लागली आहेत. यातील एखादा सूर मुख्यमंत्री पदासाठी बाहेर येईल, बंडाळी वाढेल याची भीती बाळगत 'मातोश्री'ने आधीच आदित्य आणि नंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे असे बॅनर करून ठेवले आहेत का, अशा राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

मुंबई : विधानसभा निवडणूक शिवसेना भाजप ने युती करत लढली खरी. मात्र सत्ता स्थापनेसाठी भाजप सेनेच्या युती मध्ये काडीमोड होतांना पहायला मिळत आहे. मातोश्री बाहेर युवा पक्ष प्रमुख आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार असे बॅनर लावल्या नंतर आता पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, असे बॅनर लावण्यात आले आहे. मातोश्री बाहेर ही बॅनर लावण्याची वेळ सेनेवर का आली,मातोश्रीच्या गोटात अंतर्गत बंडाळीच्या भीतीचे सावट वाढत चालले आहे, का असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत.

गेली पाच वर्षे भाजप सेना सत्तेत असतांना सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी मंत्री पदावर कारभार केला. त्यांना ही मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पडू लागली आहेत. यातील एखादा सूर मुख्यमंत्री पदासाठी बाहेर येईल, बंडाळी वाढेल याची भीती बाळगत 'मातोश्री'ने आधीच आदित्य आणि नंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे असे बॅनर करून ठेवले आहेत का, अशा राजकीय चर्चेला उधाण आले आहे. आदित्य ठाकरे हे युवा नेतृत्व आहे त्यात ते नव्याने आमदार झाल्याने, अनुभव नसल्याने त्यांचे नेतृत्व शिवसेनेच्या बड्या नेत्यांना साहजिकच नको आहे.

आपले आमदार फुटू नयेत याची काळजी जरी मातोश्रीने घेतली असली तरीही मुख्यमंत्री पदी आदित्य अथवा उद्धव ठाकरे बसतील असे बॅनर लावत आपल्याच बड्या नेत्यांचे आवाज दाबून ठेवले आहेत, अशी चर्चा आहे. अशातही शिवसेनेत ज्या बड्या नेत्यांना आपण मुख्यमंत्री होऊ, अशी स्वप्न पडत आहेत त्यांनी बंडाळीचा सूर काढला तर याचा फायदा भाजप ही घेऊ शकते, ही भीती ही 'मातोश्री' ला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख