कर्जाची परतफेड न केल्याने धनंजय मुंडेंच्या पुण्यातील फ्लॅटवर जप्ती : ते म्हणतात ही तर सूडबुद्धी

कर्जाची परतफेड न केल्याने धनंजय मुंडेंच्या पुण्यातील फ्लॅटवर जप्ती : ते म्हणतात ही तर सूडबुद्धी

पुणे : राष्ट्रवादी काॅग्रेसचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे परळीतून पंकजा मुंडे यांच्या दणदणीत पराभवाचा आनंद लुटत असतानाच त्यांच्या पुण्यातील एका फ्लॅटवर शिवाजीनगर सहकारी बॅंकेने टाच आणली आहे. कर्जाची परतफेड न केल्याने बॅंकेने कारवाई केली आहे.

राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील आमदार अनिल भोसले यांच्या ताब्यात ही बॅंक होती. काही महिन्यांपूर्वी बॅंकेवर प्रशासक नेमण्यात आला आहे. कर्जवसुलीसाठी बॅंकेने अनेक उपाययोजना सुरू केल्या असून थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

पुण्यातील माॅडेल काॅलनी भागातील मुंडे यांचा फ्लॅट जप्त करत असल्याची नोटीस बॅंकेने काल स्थानिक वर्तमानपत्रात दिली. एक कोटी 43 लाख रुपयांच्या कर्जाच्या वसुलीसाठी ही नोटीस असल्याचे सांगण्यात आले.

याबाबत बोलताना मुंडे यांनी सांगितले की एकूण कर्ज 78 लाख रुपये आहे. त्यातील 22 लाख थकलं आहे. हे माझ्यावर दर महिन्याला कसली कारवाई होते ते सर्वांना माहीत आहे. मी बँकेला सांगितलं होतं की तीन महिने निवडणूक झाल्यानंतर पाहू. मात्र एवढं सांगून ही नोटीस आली. अशा कारवाया कशा सूडपद्धतीने होतात, हे साऱ्या राज्याला माहीत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com