परशुराम वाघमारेनेच केली गौरी लंकेश यांची हत्या 

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील अटक झालेला सहावा संशयित परशुराम वाघमारे यानेच त्यांची हत्या केल्याचा दावा विशेष तपास पथकाने (एसआयटी) आज केला.
परशुराम वाघमारेनेच केली गौरी लंकेश यांची हत्या 

बंगळूर : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील अटक झालेला सहावा संशयित परशुराम वाघमारे यानेच त्यांची हत्या केल्याचा दावा विशेष तपास पथकाने (एसआयटी) आज केला. 

गौरी लंकेश, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि कन्नड साहित्यिक एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येसाठी एकच पिस्तूल वापरल्याचेही स्पष्ट झाले आहे. 

"एसआयटी'च्या वरीष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. वाघमारे यानेच लंकेश यांच्यावर गोळीबार केला आणि याच पिस्तुलातून पानसरे आणि कलबुर्गी यांनाही गोळ्या मारण्यात आल्याचे न्यायवैद्यक चाचणी अहवालातून स्पष्ट झाल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. 

हे पिस्तूल मात्र अद्याप हाती लागले नसल्याचे त्यांनी सांगितले. पिस्तूल सापडले नसले तरी त्यातून झाडलेल्या गोळीवरील खुणांवरून तपास करता येतो. 

उजव्या विचारसरणीच्या एका हिंदू गटाशी या हत्यांचा संबंध असून, त्याचे साठ सदस्य असावेत. या गटाला नाव नाही. मध्य प्रदेश, गुजरात, गोवा आणि कर्नाटकात या गटाचे सदस्य पसरलेले आहेत. उत्तर प्रदेशपर्यंत अद्याप या गटाचे धागेदोरे आढळून आलेले नाहीत, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली. 
हा गट महाराष्ट्रातील काही हिंदुत्ववादी संघटनांमधून सदस्य गोळा करत असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. गौरी लंकेश यांची गेल्या वर्षी पाच सप्टेंबरला त्यांच्या राहत्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. 
राजकारणाच्या बित्तंबातम्यांसाठी डाऊनलोड करा sarkarnama अॅप 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com