मंगलदास बांदल यांनी अजितदादांची भेट घेऊन उडविली धांदल

..
mangaldas bandal meets ajit pawar
mangaldas bandal meets ajit pawar

मुंबई : पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांनी पुन्हा राजकीय धांदल उडवून दिली आहे. अर्थात ते आपली धांदल केवळ पुणे जिल्ह्यापुरती उडवून देत होते. मात्र थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन बांदल हे सर्वच टिव्ही वाहिन्यांवर झळकले.

अजितदादांचा राष्ट्रवादीतील गट त्यांच्यासाठी सक्रिय झाल्याची घोषणा त्यांनी यानिमित्ताने केली. तसेच अजितदादांच्या मागे किती आमदार आहेत, विधानसभेत स्पष्ट होईलच, असाही दावा त्यांनी केला. त्यामुळे बांदल यांच्या विधानांची सर्वच वाहिन्यांनी दखल घेतली.

अजित पवार यांच्या बाजूने अधिकृतरित्या राष्ट्रवादीतील नेेते बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळे बांदल हेच पहिले नेते ठरले. शरद पवार साहेब हे हिमालय आहे आणि त्यांच्यासाठी सह्याद्री कधीही धाऊन जाईल, असे सांगण्यास ते विसरले नाहीत.

अजितदादा पवार हे उद्या पत्रकार परिषद घेणार असल्याचेही बांदल यांनी सांगितले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ही शक्यता मावळल्याचे दिसत आहे. पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पुण्यातील काही नगरसेवक, सोमेश्वर कारखान्याचे संचालक हे अजितदादांना मुंबईत भेटले. पण अधिकृतरित्या त्यांना पाठिंबा कोणी दिला नव्हता. बांदल यांनी तो देऊन आपली निष्ठा त्यांच्यावरच असल्याचे दाखवून दिले. त्यांचा त्यांना फटका बसणार की फायदा होणार हे आगामी काळात दिसेल. मात्र कोणत्याही कारणाने चर्चेत राहण्याची सवय बांदल यांनी येथेही दाखवून दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com