मंगलदास बांदलांचा राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून वळसे पाटलांच्या विरोधात अर्ज

मंगलदास बांदलांचा राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून वळसे पाटलांच्या विरोधात अर्ज

मंचर : आंबेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या पैलवान बांदल यांनी आज राष्ट्रवादीचे उमेदवार आपणच असल्याचा दावा करत पक्षाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. गेले सात-आठ दिवस बांदल हे शिवसेना नेत्यांच्या संपर्कात होते. त्यांना राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. तरी त्यांनी विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात अर्ज भरल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राष्ट्रवादीकडून उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. बांदल यांना अधिकृत उमेदवारीचे पत्र (एबी फाॅर्म) दिलेले नाही. तरीही त्यांनी शिवसेनेचा नाद सोडून परत राष्ट्रवादीचा तर रस्ता धरला नाही ना, अशी शंका व्यक्त होत आहे. 

ते मुंबई येथे मातोश्रीवर गेल्याची चर्चा होती. ते शिवसेनेकडून निवडणूक लढवणार असा प्रचारही काही त्यांच्या समर्थकांनी आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदारसंघात सुरू केला होता.

जारकरवाडी येथे तर  विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासमवेतही ते हजर असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. गेल्या काही दिवसापासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमापासून  व नेत्यांपासून फटकून ते वागत होते. शिवसेनेच्या काही नेत्यांबरोबरव त्यांच्या गुप्त बैठक  झाल्याची चर्चा मतदारसंघात होती .त्यामुळे शिवसेनेकडून त्यांची उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा होती.

विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्याविरोधात ते निवडणूक रिंगणात उतरणार अशा पद्धतीच्या चर्चांना उधाण आले होते पण अचानकपणे मंगळवारी त्यांनी थेट उमेदवारी अर्ज दाखल केला तोही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ही माहिती तवाऱ्यासारखी आंबेगाव शिरूर मतदारसंघात पसरली. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.

सर्वच राजकीय पक्षांना बुचकळ्यात टाकणारे पैलवान अशी त्यांची ची ख्याती असल्यामुळे यापुढे ते नेमकी काय भूमिका घेणार याविषयी या मतदारसंघात उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यांच्या विश्वासार्हतेबद्दल दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांकडून शंका व्यक्त केली जाते.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारांवर अनेक हल्ले केले होते. अशाही परिस्थितीत शिवसेना नेत्यांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली. ही चर्चा सुरू असतानाच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मतदारसंघात खळबळ उडाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com