बबनराव लोणीकरांचा कॉंग्रेसच्या जेथलियावर दणदणीत विजय

..
बबनराव लोणीकरांचा  कॉंग्रेसच्या जेथलियावर दणदणीत विजय

परतूरः परतूर विधानसभा मतदारसंघात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी कॉंग्रेस आघाडीच्या सुरेश जेथलिया यांच्यावर दणदणीत विजय मिळवला आहे. थेट झालेल्या या लढतीत लोणीकरांनी जेथलियांचा तब्बल 25942 मतांनी पराभव केला.

परतुर मतदार संघात एकूण 14 उमेदवार रिंगणात होते. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे येथील लढत चुरशीची होईल असा अंदाज होता. पण वंचिता प्रभाव फारसा जाणवला नाही. मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून बबनराव लोणीकर आघाडीवर होते. परतूर, मंठा व सेवली शहर वगळता कॉंग्रेसला इतर भागात फारशी आघाडी घेता आली नाही. कोकटे हदगाव, आष्टी, सतोना, वाटुर या सर्कल मधून लोणीकर यांनी मोठी आघाडी मिळाली.

तर मंठा तालुक्‍यातील ग्रामीण भागातून देखील भाजपला चांगले मताधिक्‍य मिळाले. मतदार संघातील 2 लाख 96 हजार 166 मतदारांपैकी 2 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. बबनराव लोणीकरांना 106321, तर जेथलिया यांना 80379 मते मिळाली. वंचितचे शिवाजी सवणे यांना 8591, तर माकपच्या सरीता शर्मा यांना 2180 मते मिळाली.

थेट झालेल्या लढतीत लोणीकरांनी जेथलियांचा 25942 मतांनी पराभव करत पुन्हा विजय मिळवला. लोणीकर यांनी तालुक्‍यात केलेली विकासकामे, खेचून आणलेला निधी, पुत्र राहुल लोणीकर यांनी निवडणुकीची यशस्वीपणे संभालेली प्रचार यंत्रणा याचा विजयात मोठा वाटा असल्याचे बोलले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com