बाळू धानोरकरांनी कॉंग्रेसला महाराष्ट्रातून नामशेष होण्यापासून वाचवले

गेल्या काही वर्षांमध्ये एक-एक करत कॉंग्रेसचा राज्यातून सफाया होत गेला. 2014 च्या निवडणुकीत कॉंग्रेसचे फक्त दोनच खासदार होते. यावेळी महाराष्ट्रातून कॉंग्रेसचा सफाया होता-होता वाचला.
बाळू धानोरकरांनी कॉंग्रेसला महाराष्ट्रातून नामशेष होण्यापासून वाचवले

नागपूर : गेल्या काही वर्षांमध्ये एक-एक करत कॉंग्रेसचा राज्यातून सफाया होत गेला. 2014 च्या निवडणुकीत कॉंग्रेसचे फक्त दोनच खासदार होते. यावेळी महाराष्ट्रातून कॉंग्रेसचा सफाया होता-होता वाचला. 

ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये आलेले बाळू धानोरकर यांनी कॉंग्रेसला महाष्ट्रातून नामशेष होण्यापासून वाचविले.

यावेळी कॉंग्रेसची दाणादण झाली. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना त्यांचाच गृहजिल्हा नांदेडमध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय. तिकडे सोलापुरात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेही पराभूत झालेत. मुंबईतही कॉंग्रेसला मतदारांनी नाकारलंय. दक्षिण मुंबईतून कॉंग्रेसच्या विद्यमान मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरांचा तर उत्तर-पश्‍चिम मतदार संघातून मुंबईचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांना पराभव झाला.

कधी काळी सत्तेत राहिलेल्या कॉंग्रेसचा फक्त एक खासदार निवडून आलाय. तो म्हणजे चंद्रपुरात बाळू धनोकरांच्या रुपानं आणि तेही मुळ कॉंग्रेसी नाहीत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून ते कॉंग्रेसमध्ये आलेले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून राज्यात कॉंग्रेसची जोरदार पिछेहाट सुरु आहे. 2014 मध्ये कॉंग्रेसचे दोन खासदार होते. नांदेडमधून अशोक चव्हाण तर हिंगोलीतून राजीव सातव कॉंग्रेसचं प्रतिनिधित्व करत होते.

2019 मध्ये कॉंग्रेस खासदारांची संख्या एक वर आलीय. सक्षम नेतृत्वाचा अभाव, नेत्यांमधील गटातटाचं राजकारण आणि समन्वयाचा अभाव ही कॉंग्रेसच्या अपयशाची मुख्य कारण असल्याचे दिसते. येत्या विधानसभेत चांगली कामगिरी
करुन दाखविण्यासाठी कॉंग्रेसला भरपूर मेहनत घ्यावी लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com