बाळदादांचे थेट अजितदादांनाच आव्हान! मोहिते-पवार संघर्षाला पुन्हा सुरवात

....
Baldada mohite challenges ajit pawar
Baldada mohite challenges ajit pawar

नातेपुते : राष्ट्रवादी काँग्रेसने अगोदर भाजपच्या मदतीने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलेल्या अजित पवारांवर कारवाई करावी आणि नंतर आमच्यावर कारवाई करावी असे उघड आव्हान विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह उर्फ बाळदादा मोहिते पाटील यांनी दिले आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा जिल्हा परिषद सदस्यांनी भाजप व समविचारी आघाडीला मतदान करून त्यांना विजयास मदत केली. या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेसने मोहिते पाटील समर्थक स्वरूपाराणी मोहिते-पाटील, शितलदेवी मोहिते-पाटील, सुनंदा फुले, मंगल वाघमोडे, गणेश पाटील, अरुण तोडकर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे व तशी नोटीस बजावली आहे.

या नोटीशीबाबत जयसिंह मोहिते पाटील म्हणाले, या कारवाईला आम्ही घाबरत नाही. आम्ही लेचेपेचे नाहीत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नैतिकतेच्या गोष्टी सांगू नयेत. अजित पवार यांनी भाजपच्या मदतीने भल्या पहाटे उपमुख्यमंत्री पद स्वीकारले होते. अगोदर त्यांच्यावर कारवाई करा. नंतर आम्ही आमचे पाहू, असे उघड आव्हान दिले आहे.

मोहिते पाटील गटाचे पडद्यामागचे मुख्य सल्लागार व संपूर्ण तालुक्याची नसननस माहीत असणाऱ्या बाळदादांच्या या सडेतोड उत्तराने फक्त माळशिरस तालुकाच नव्हे तर संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार विरुद्ध मोहिते पाटील घराणे असा राजकीय संघर्ष सुरू झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com