मुश्रीफ व सतेज पाटलांच्या वादात बाळासाहेब थोरात!

मुश्रीफ व सतेज पाटलांच्या वादात बाळासाहेब थोरात!

मुंबई  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत.  यात कोल्हापूरचे हसन मुश्रीफ हे नगरला आणि नगरचे बाळासाहेब थोरात हे कोल्हापूरला पालकमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. 

कोल्हापूरचे पालकमंत्री कोण होणार यावर मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यात वाद होता. या वादात थोरात यांना नेमण्यात आले. रायगडमध्ये स्थानिक शिवसेना नेत्यांनी आदिती तटकरे यांना पालकमंत्री म्हणून नेमू नये, अशी मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत तटकरे याच पालकमंत्री झाल्या आहेत. संदिपान भुमरे, दत्तात्रेय भरणे यांना पालकमंत्रीपद मिळाले नाही. आदित्य ठाकरे यांना पहिल्याच मंत्रिपदाच्या कारकिर्दीत मुंबई उपनगर हा जिल्हा मिळाला आहे.

संदिपान भुमरे हे कॅबिनेट मंत्री असूनही त्यांना पालकमंत्रीपद मिळाले नाही. त्या तुलनेत ज्युनिअर असलेल्या व राज्यमंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांना धुळ्याचे पालकमंत्रीपद मिळाले आहे.   

1.       पुणे- श्री. अजित अनंतराव पवार
2.        मुंबई शहर- श्री. अस्लम रमजान अली शेख
3.        मुंबई उपनगर- श्री. आदित्य उद्धव ठाकरे  
4.        ठाणे- श्री. एकनाथ संभाजी शिंदे
5.        रायगड - श्रीमती आदिती सुनिल तटकरे
6.        रत्नागिरी-  अनिल दत्तात्रय परब
7.        सिंधुदुर्ग- श्री. उदय रविंद्र सामंत
8.        पालघर- श्री. दादाजी दगडू भुसे
9.        नाशिक- श्री. छगन चंद्रकांत भुजबळ
10.       धुळे- श्री. अब्दुल नबी सत्तार
11.       नंदुरबार- के.सी. पाडवी
12.       जळगाव- श्री. गुलाबराव रघुनाथ पाटील
13.       अहमदनगर- श्री. हसन मियालाल मुश्रीफ
14.       सातारा- श्री. शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील
15.       सांगली- श्री. जयंत राजाराम पाटील
16.        सोलापूर- श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
17.        कोल्हापूर- श्री. विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
18.        औरंगाबाद- श्री. सुभाष राजाराम देसाई
19.        जालना- श्री. राजेश अंकुशराव टोपे
20.        परभणी- श्री. नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
21.        हिंगोली- श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड
22.        बीड- श्री. धनंजय पंडितराव मुंडे
23.        नांदेड- श्री. अशोक शंकरराव चव्हाण
24.        उस्मानाबाद- श्री. शंकरराव यशवंतराव गडाख
25.        लातूर- श्री. अमित विलासराव देशमुख
26.        अमरावती-  यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)
27.        अकोला- श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू
28.        वाशिम- श्री. शंभुराज शिवाजीराव देसाई
29.        बुलढाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे
30.        यवतमाळ- श्री. संजय दुलीचंद राठोड
31.        नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत
32.        वर्धा- श्री. सुनिल छत्रपाल केदार
33.        भंडारा- श्री. सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील
34.        गोंदिया- श्री. अनिल वसंतराव देशमुख

35.        चंद्रपूर- श्री. विजय नामदेवराव वडेट्टीवार
36.        गडचिरोली- श्री. एकनाथ संभाजी शिंदे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com