balasaheb thorat warned sanjay raut about indira gandhi statement | Sarkarnama

इंदिरांजीविषयी संजय राऊतांचे विधान चुकीचेच, सहन करणार नाही, थोरातांचा इशारा

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 जानेवारी 2020

पुणे :शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविषयी केलेले वादग्रस्त विधान चुकीचेच होते. भविष्यात अशाप्रकारचे विधान कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही असा इशारा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज दिला आहे. 

राऊत यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतील भाजपचे नेते आणि माजी खासदार उदयनराजे, इंदिरा गांधी यांच्याविषयी केलेल्या धक्कादायक विधानाने आज राज्यात नाराजी व्यक्त केली जात आहे.

साताऱ्यात उदयनराजे समर्थकांनी बंद पुकारला आहे. तर दुसरीकडे देशभरातील कॉंग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. कुख्यात गुन्हेगार करीमलाला याची भेट घ्यायला इंदिरा गांधी जात असत असे विधान करून राऊत यांनी नाराजी ओढावून घेतली आहे. 

आज कॉंग्रेसने गंभीर इशारा दिल्यानंतर राऊत यांनी आपण इंदिरा गांधी यांच्याविषयी केलेले विधान मागे घेत असून जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील मी दिलगिरी व्यक्त करतो असे म्हटले आहे. थोरात म्हणाले, की राऊत यांनी विधान मागे घेतल्याने वाद मिटला आहे. पण, भविष्यात कोणत्याही महापुरूषांविषयी विधान करू नये. आम्ही कदापी सहन करणार नाही. कोणतेही विधान करताना सांभाळून केले पाहिजे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख