संगमनेरमध्ये राज्यस्तरीय आपत्कालीन मदत कक्षाची स्थापन

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने विविध उपाययोजना आखल्या जात आहेत.
balasaheb thorat
balasaheb thorat

संगमनेर (नगर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणारे विविध प्रश्‍न सोडवण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून 'यशोधन' या संगमनेर येथील मध्यवर्ती कार्यालयात स्वतंत्र राज्यस्तरीय आपत्कालीन कक्ष सुरू करण्यात आला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. या अंतर्गत संगमनेर येथील 'यशोधन' संपर्क कार्यालयात 24 तास मदतीसाठी सज्ज असलेला राज्यस्तरीय आपत्कालीन मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत गरजू नागरिकांना वैद्यकीय मदत, रुग्णवाहिका, निवास व भोजन व्यवस्थेसाठी पाठपुरावा केला जाणार आहे. तसेच जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा, जास्त दराने विक्री व उपलब्धता, जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक याबाबतच्या समस्या सोडविल्या जाणार आहेत. कोरोनाच्या
काळात नागरिकांचे प्रश्‍न नोंदवून घेतले जाणार असून, ते योग्य विभागामार्फत सोडवले जाणार आहेत.

दरम्यान, राज्यपातळीवर लोकांना काही अडचणी असल्यास ते थेट या कक्षात संपर्क करू शकतात. तेथे आपत्कालीन कामे करण्याची यंत्रणा सक्रीय आहे. राज्यपातळीवरील अडचणी सोडविण्यासाठी संबंधित जिल्हास्तरावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची यंत्रणा सक्रीय करण्यात आली असून, त्याचे नियंत्रण येथून करण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com