Balasaheb Thorat says i would have been happy if Praniti Shinde was inducted in cabinet | Sarkarnama

प्रणिती शिंदे मंत्रीमंडळात असत्या तर आनंदच झाला असता  : थोरात

सरकारनामा
बुधवार, 1 जानेवारी 2020

मंत्रीमंडळ तयार झाल्यानंतर पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये खातेवाटप पूर्ण होत असते.

मुंबई :  आमदार प्रणिती शिंदे या चांगल्या काम करत आहेत. त्या मंत्रीमंडळात असत्या तर आनंदच झाला असता, परंतू काही बाबी मनासारख्या होत नाहीत त्यामुळे थोडीशी नाराजी असली तरी ती दूर होईल, असे  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले . 

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले , मंत्रीमंडळ तयार झाल्यानंतर पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये खातेवाटप पूर्ण होत असते. मंत्रीमंडळ विस्ताराला दोनच दिवस झाले आहेत. त्यामुळे खातेवाटपही लवकर पूर्ण होईल.खातेवाटप करताना काही बदल अपरिहार्य असतो. पण कॉंग्रेसमुळे खातेवाटप करण्यात उशीर झालेला नाही. 

आमदार संग्राम थोपटे यांच्याशी माझं रात्रीत बोलणं झालं . त्यांना सन्मान केला जाईल असेही  श्री. थोरात यांनी सांगितले. 

थोपटे यांना मंत्रिपद न दिल्याने नाराज झालेल्या काही कार्यकर्त्यांनी पुण्यातील कॉंग्रेस कार्यालयाची तोडफोड करून धिंगाणा घातला होता. या घटनेविषयी बोलताना थोरात म्हणाले, की कॉंग्रेस पक्ष हे कुटुंब आहे त्यामुळं त्या पद्धतीनं विचार केला जाईल. आमचं तीन पक्षांचं सरकार आहे. त्यामुळं मंत्री पद कमी वाट्याला आली. मंत्रिपदावरुन कुठेही वाद नाही. 

खाते वाटप विषय आता मोठा विषय राहिलेला नाही. येणाऱ्या 2 दिवसांमध्ये यावर मार्ग निघेल. खाटेवाटपाविषयी कोणाचीही नाराजी नाही. सकाळी जीएसटी संदर्भात बैठक झाली, असे  अशोक चव्हाण यांनी सांगितले .

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख