बाळासाहेब थोरात म्हणाले,  सत्ता आली आता पक्ष बळकट करा

महायुतीची सत्ता येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात आली. आता विकासाची कामे घेऊन जनतेत जा आणि पक्ष बळकट करा -बाळासाहेब थोरात
balasaheb_thorat_.j
balasaheb_thorat_.j

नागपूर  कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी देवगिरी येथे बैठक घेऊन राजकीय परिस्थितीवर पक्षसंघटनेबाबत चर्चा केली. महायुतीची सत्ता येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात आली. आता विकासाची कामे घेऊन जनतेत जा आणि पक्ष बळकट करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

आशिष दुवा यांनी पक्ष संघटनेला मजबूत करण्याकरीता ब्लॉक स्तरावर कार्य करणे आवश्‍यक असल्याचे सांगितले. प्रत्येक बुथवर 10 कार्यकर्त्याची निवड करा. वार्डा-वार्डांमध्ये जाऊन नागरिकांच्या समस्या सोडवा अशा सूचना केल्या. शहर अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांच्या माध्यमाने शहर कॉग्रेस कमेटीच्या पदाधिकाऱ्यांना शासकीय समित्यांमध्ये सामावून घेतले जाईल, असे ते म्हणाले.


 विकास ठाकरे यांनी सत्ता असल्याने कार्यकर्त्यांना विविध शासकिय कमेटीवर घेवून त्यांना मानाचे दंडाधिकारी पद तसेच मंत्र्यांनी कार्यकर्त्यासोबत प्रेमाने वागावे, पक्षाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहावे, अशी सूचना केली.

बैठकीचे संचालन प्रदेश सरचिटणीस रामकिसन ओझा यांनी केले. बैठकीमध्ये प्रदेश सचिव विशाल मुत्तेमवार, सचिव अतुल कोटेचा, उमाकांत अग्निहोत्री, सचिव अतुल लोढे, गिरीश पांडव, आशिष देशमुख, शेख हुसैन, प्रधान महासचिव डॉ. गजराज हटेवार, प्रा.दिनेश बानाबाकोडे, प्रशांत धवड, जयंत लुटे, नगरसेवक संदीप सहारे, रमेश पुणेकर, मनोज सांगोळे, रमण ठवकर, किशोर गजभिये आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com