0 विरुद्ध 12 होऊ नये याची काळजी घ्या; विखेंना टोला!

स्थानिक विरोधकांच्या संस्थांनाही मदतच केली. जे आता बोलतात, "त्यांना' भावाचे कॉलेजही सहन झाले नाही. राजकारणात कधी व्यक्तिद्वेष केला नाही.
0 विरुद्ध 12 होऊ नये याची काळजी घ्या; विखेंना टोला!

संगमनेर (नगर) : " पहिल्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी म्हणून दिल्लीच्या आदेशाने आलेल्या शकुंतला थोरात यांच्यामुळे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब थोरात व ज्येष्ठ नेते बी. जे. खताळ पाटील यांची संधी गेली. त्यामुळे मी अपक्ष निवडणूक लढविली. त्यातून माझा राजकीय जन्म झाल्याने, पुढील काळात शकुंतला थोरात यांना "माऊली' म्हणूनच संबोधले. परिवर्तनाच्या वल्गना करणाऱ्यांनी जिल्ह्यात शून्य विरुद्ध बारा होऊ नये याची काळजी घ्यावी,'' असा टोला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लगावला.

कारखान्याचे अध्यक्ष, आमदार, मंत्री, कॉंग्रेसच्या कोअर कमिटीचे सदस्य ते थेट प्रदेशाध्यक्ष, या प्रवासातही कला, संगीत, राजकारण, साहित्य आदी विषयांवर थोरात यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. निमित्त होते प्रकट मुलाखतीचे! शहरातील व्यापारी, व्यावसायिक, राजस्थान मित्रमंडळ, डॉक्‍टर, वकील व मेडिकल असोसिएशन, रोटरी क्‍लब, लायन्स क्‍लब, इनरव्हील, विविध गणेशोत्सव मंडळे, साहित्य परिषद, लायन्स सफायर आदींसह विविध सेवाभावी संघटनांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम झाला. 

थोरात म्हणाले, "उलट तेच कनोली, मनोली, कनकापूर, देर्डे, कोऱ्हाळे, हसनापूरभोवती फिरत आहेत. आपण मात्र राज्यात मुक्त संचार करीत आहोत. पाणी एके ठिकाणी साचले तर शेवाळते; आपण मात्र प्रवाही राहिलो.'' विरोधक 35 वर्षांत काय केले, असे विचारतात म्हणताच, निळवंडे धरणाच्या पूर्णत्वाच्या आठवणी सांगताना, या कामी तत्कालीन मुख्यमंत्री (स्व.) विलासराव देशमुख यांनी केलेल्या मदतीचा थोरातांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. "आधी पुनर्वसन; मग धरण' असा राज्यात आदर्श निर्माण केला. संगमनेरसाठी थेट धरणातून पाइपलाइन आणली.''

प्रास्ताविकात उद्योजक मनीष मालपाणी यांनी, संगमनेरचा आर्थिक विकास साधणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाचा मागोवा घेण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com