थोरातांचे विखेंना चॅलेंज : काँग्रेस व मित्रपक्षांची मोट बांधून शिर्डी जिंकू 

Vikhe-THorat-
Vikhe-THorat-

राहाता /शिर्डी : " आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिर्डी मतदारसंघात काँग्रेस व मित्रपक्षांची एकत्रितपणे मोट बांधून ही जागा जिंकू. या मतदार संघात अनेक समस्या आहेत. त्या आपण सोडवू ," अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण  विखेंना चॅलेंज दिले 

बाळासाहेब थोरात पुढे   म्हणाले की ,"  भाजप व सेना राज्यात आभासी चित्र निर्माण करते. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे. शिर्डीसह अहमदनगर जिल्हा कायम काँग्रेसच्या विचारांचा राहिला आहे. येथील नेते बदलले मात्र जनता ही लोकशाही समता , बंधुता व विकासाच्या म्हणजे काँग्रेसच्या विचारांची आहे."

" शिर्डी  मतदारसंघात काँग्रेस व मित्र पक्षांचे कार्यकर्ते व जनता यांच्या ही मोठ्या संख्येने आहे. शिर्डी मतदारसंघात अनेक समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी कार्यकर्ते आपल्याकडे येत आहेत. शिर्डी मतदारसंघातील जनतेला परिवर्तन हवे आहे.या तालुक्यात लोकशाही नाही. लोकांना परिवर्तन व शांतता हवी आहे . आजही पिण्याच्या पाण्यासाठी जनतेला मोठी वणवण करावी लागते. " 

बाळासाहेब थोरात यांनी  शनिवारी  तालुक्यातील गोगलगाव , निर्मळ पिंपरी , केलवड यांसह विविध गावांना भेटी दिल्या.  यावेळी डॉ.एकनाथ गोंदकर, श्रीकांत मापारी, उत्तम घोरपडे, विनायक चौधरी, सोपान पडवळ,गौतम आहेर,बाळासाहेब वर्पे,सुभाष निर्मळ,योगेश निर्मळ,राजु निर्मळ,गंगाधर गमे, नारायण घोरपडे, नानासाहेब शेळके,सुधीर म्हस्के,ज्ञानेश्वर कर्पे व निळवंडे कृती समितीचे कार्यकर्ते,उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com