बाळासाहेब थोरातांच्या कन्या डाॅ. जयश्री यांनी आदिवासी नृत्यावर धरला ठेका (व्हिडिओ)

आदिवासी महिलांसोबत आदिवासी नृत्य असलेले फुगडीप्रकारात सहभागी होऊन महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डाॅ. जयश्री थोरात यांनी आदिवासी महिलांना आपलेसे केले
Minister Balasaheb Thorat Daughter Visited Tribals
Minister Balasaheb Thorat Daughter Visited Tribals

अकोले  : आदिवासी महिलांसोबत आदिवासी नृत्य असलेले फुगडीप्रकारात सहभागी होऊन महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डाॅ. जयश्री थोरात यांनी आदिवासी महिलांना आपलेसे केले. उडदावणे (ता. अकोले) येथे होळीच्या सणात त्या आदिवासींमध्ये रममान झाल्या. या वेळी त्यांनी आदिवासी महिलांचे प्रश्न जाणून घेतले. तसेच साडी व लुगड्यांचे वाटप केले. आदिवासी गाण्यांवर त्यांनी ठेका धरल्यानंतर महिलांनी जल्लोष केला.

डाॅ. जयश्री या थोरात यांच्या धाकट्या कन्या आहेत. त्या कॅन्सर तज्ज्ञ आहेत. सध्या मुंबई येथील कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. एकविरा फौंडेशनच्या माध्यमातून महिला सबलीकरण व राज्याच्या विविध आदिवासी भागात त्या काम करतात. नाशिक जिल्ह्यातील कौठदरा येथील एसएमबीटी मध्येही त्यांचे आदिवासींवर संशोधन सुरू आहे. कँसरतज्ज्ञ म्हणून त्या रोज किमान सात ते आठ शस्त्रक्रिया करतात. त्यांना सामाजिक कामाची आवड असल्याने नऊ मार्च रोजी आपल्या मैत्रिणी डाॅ. कल्याणी गुंजाळ, प्रा. वृषाली साबळे यांच्यासोबत त्या उडदवणे या आदिवासी पाड्यात पोहचल्या. 

तत्पूर्वी त्यांनी विविध पक्षांचे आवाज काढणारे (कै.) ठकाबाबा गांगड यांचे चिरंजीव सखाराम गांगड, बुधाजी गांगड यांना निरोप पाठवून आम्ही येतो, असे सांगितले. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास डॉ. जयश्री आपल्या मैत्रणीसमवेत तिथे पोहचल्या. पाड्यातील महिलांनी आपल्या अंगावर नवीन फडकी, साडी बाजूबंद घालून त्यांचे स्वागत केले. गावातील महिलांच्या त्यांच्यासोबत ओळखी झाल्या. सखाराम गांगड यांनी आपल्या आदिवासी भागाची त्यांना माहिती दिली. येथील पारंपरिक संस्कृती सण, उत्सवाबाबत माहिती देऊन झाल्यावर आदिवासी महिलांनी फुगडी, कोंबडनृत्य, जात्यावरच्या गाणी, देव देवतांची गाणी, होळीची गाणी सादर केली. या वेळी डॉ. जयश्री व त्यांच्या मैत्रिणींनी त्यांच्यात सहभागी होऊन त्याच्या फुगडी नृत्यावर ताल धरला व तब्बल चार तास तेथेच रमल्या. 

त्या म्हणाल्या, मी पुन्हा येईन

महिलांनी फेर धरून त्यांना आपल्या पद्धतीने ढोलाच्या व पारंपरिक वाद्यांवर ताल धरण्यास लावले. ते त्यांना जमलेही. मग सर्व महिलांनी एकत्र येऊन स्नेहभोजन केले. गप्पांचा फडही रंगला. आरोग्याच्याबाबत आदिवासी महिलांना डॉ. जयश्री यांनी मार्गदर्शन केले. उडदवणे गावाला दरवर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते. पाच किलोमीटरवरून पाणी आणावे लागते. त्यासाठी नवीन पाणी योजना करून सरकारने निधी द्यावा, या  योजनेबाबत निवेदन देण्यात आले. या वेळी त्यांचाला सबलीकरण आदिवासी महिलांनी फडकी घालून सत्कार केला व मी पुन्हा पुन्हा येईल, असा शब्द देऊन त्या पुन्हा संगमनेरकडे रवाना झाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com