मोदी सरकारने पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करायला हव्या होत्या!

डॉ. मनमोहन सिंह यांचे सरकार असताना कच्च्या तेलाच्या किमती 143 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोचल्यानंतर 120 डॉलरवर स्थिरावल्या होत्या. त्यावेळी पेट्रोल प्रतिलिटर 73 रुपये होते. आताचे सत्ताधारी भाजपाचे नेते त्यावेळी पेट्रोल डिझेलच्या किमती कमी कराव्यात म्हणून देशभर आंदोलन करत होते.
balasaheb thorat criticizes modi government
balasaheb thorat criticizes modi government

संगमनेर (नगर) : आंतरराष्ट्रीय बाजारात दोन महिन्यांपासून सातत्याने कच्च्या तेलाच्या किमतीत घट होत असून, सध्या कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 35 डॉलरपेक्षा खाली आली आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात किमती कमी होऊनही पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करण्याऐवजी, उत्पादन शुल्क तीन रुपयांनी वाढवणारे केंद्रातील सुटाबुटातले लुटारू सरकार आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

ते म्हणाले, कच्च्या तेलाच्या किमतीत 1991 नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात घट होण्य़ाची पहिलीच वेळ आहे. पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करून मोदी सरकार सामान्य जनतेला त्याचा लाभ देईल, अशी आशा असताना, उत्पादन शुल्कात तीन रुपयांची वाढ करून मोदी सरकारने लुटमार करण्याचा उद्योग केला आहे. या किमती कमी केल्या असत्या, तर आधीच महागाईने होरपळलेल्या सामान्य जनतेला दिलासा मिळाला असता. 

डॉ. मनमोहन सिंह यांचे सरकार असताना कच्च्या तेलाच्या किमती 143 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोचल्यानंतर 120 डॉलरवर स्थिरावल्या होत्या. त्यावेळी पेट्रोल प्रतिलिटर 73 रुपये होते. आताचे सत्ताधारी भाजपाचे नेते त्यावेळी पेट्रोल डिझेलच्या किमती कमी कराव्यात म्हणून देशभर आंदोलन करत होते. आता कच्च्या तेलाच्या किमती व पेट्रोलच्या दरातली तफावत दिसत आहे. आज पेट्रोल प्रतिलिटर 75 रुपयांपर्यंत आहे. ही किंमत किमान 10 रुपयांनी कमी झाली असती, मात्र तशी मानसिकता या सरकारची नसल्याचा टोला थोरात यांनी लगावला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com