बाळासाहेब थोरात केवळ संगमनेरचेच प्रदेशाध्यक्ष असल्यासारखे वागत आहेत - आशिष देशमुख

कॉंग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे केवळ संगमनेरचेच प्रदेशाध्यक्ष असल्यासारखे वागत आहेत. निवडणूक जाहीर झाली असतानाही थोरात आपल्या मतदारसंघाच्या बाहेर पडलेले नाही. ते फक्त संगमनेर मतदारसंघाचे प्रदेशाध्यक्ष आहेत का? असा सवाल उपस्थित करीत माजी आमदार आशिष देशमुख यांनी पक्ष नेतृत्वावरच थोफ डागली.
बाळासाहेब थोरात आणि आशिष देशमुख
बाळासाहेब थोरात आणि आशिष देशमुख

नागपूर - कॉंग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे केवळ संगमनेरचेच प्रदेशाध्यक्ष असल्यासारखे वागत आहेत. निवडणूक जाहीर झाली असतानाही थोरात आपल्या मतदारसंघाच्या बाहेर पडलेले नाही. ते फक्त संगमनेर मतदारसंघाचे प्रदेशाध्यक्ष आहेत का? असा सवाल उपस्थित करीत माजी आमदार आशिष देशमुख यांनी पक्ष नेतृत्वावरच थोफ डागली. 

यावेळी त्यांनी शरद पवार यांचा आदर्श घेण्याचा सल्लाही कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांना दिला. पक्षाच्या शिर्षस्थ नेत्यांना महाराष्ट्रातील या परीस्थितीची माहीती दिली असल्याचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी आज "सरकारनामा'ला सांगून पक्षाला घरचा अहेर दिला.

आशिष देशमुख 2014 मध्ये भाजपच्या तिकीटावर काटोलमधून आमदार झाले होते. पण नंतर भाजपच्या संस्कृतीशी ताल न जुळल्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

देशमुख म्हणाले, ``विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. सर्वच पक्ष व त्यांचे नेते रस्त्यावर उतरले आहेत. गावोगावी फिरत आहेत. मात्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात तसेच त्यांच्या दिमतीला पाच कार्याध्यक्ष असताना कोणीच संपूर्ण राज्याच्या विचार करताना दिसत नाही. स्वतःचा मतदारसंघ आणि स्वतःची तिकीट यातच ते मश्‍गुल आहेत. याउलट निवडणूक जाहीर व्हायच्या आधीपासून शरद पवार या वयातही नेते व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आवश्‍यक तेथे स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन करीत आहेत. त्यांचे अनेक नेते सोडून गेले. तब्येतही साथ देत नाही. असे असताना जराही उसंत न घेता ते जातीने पक्षकार्यात लक्ष घालीत आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी जाहीर झाली आहे. किमान कॉंग्रेसच्या नेत्यांनी पवार यांच्याकडे बघून तरी कामाला लागावे.''

भाजपचे पाच वर्षांत फक्त जनतेला भूलथापा दिल्या. मंदीमुळे अनेक उद्योग बंद पडत आहे. शेतकरी मेटाकुटीला आला आहे. नवे रोजगार सोडाच आहे तेच रोजगार गमावण्याची वेळ युवकांवर आली आहे. भाजपला उघडे पाडण्याची विधानसभेची निवडणूक चांगली संधी आहे. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यात तब्बल पंधरा वर्षानंतर कॉंग्रेसने कमबॅक केले आहे. महाराष्ट्रातील जनताही भाजपवर नाराज आहे. या विरोधात आता दोन्ही कॉंग्रेसने संघटित होऊन आवाज बुलंद करण्याची गरज आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. महाराष्ट्रात पुन्हा आघाडीचे सरकार सत्तेवर येऊ शकते. आपण दिल्ली भेटीत शीर्षस्थ नेत्यांच्या कानावर हा प्रकार घातला आहे. ते निश्‍चितच काहीतर आदेश देतील, अशी आशाही आशिष देशमुख यांनी व्यक्त केली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com