इतरांना संधी मिळावी म्हणून नगरचे पालकमंत्रीपद नाकारले : बाळासाहेब थोरात

सत्ता न मिळाल्याने भारतीय जनता पार्टीची अवस्था पाण्यावाचून तडफडणाऱ्या माशासारखी झाली आहे. मात्र, आमचे सरकार पूर्ण पाच वर्षे टिकेल व राज्यातील जनतेसाठी पूर्ण क्षमेतेने काम करेल, असा विश्‍वास थोरात यांनी व्यक्त केला.
इतरांना संधी मिळावी म्हणून नगरचे पालकमंत्रीपद नाकारले : बाळासाहेब थोरात

पुणे : इतरानांही संधी मिळावी यासाठी नगरचे पालकमंत्रीपद आपण नाकारले. पक्षाची राज्याची जबादारी माझ्याकडे आहे. त्यामुळे पालकमंत्रीपद इतरांना दिले तरी पालकाच्या भूमिकेतून जिल्ह्याच्या विकासकामांकडे लक्ष राहीलच, असे महसूलमंत्री व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज पुण्यात स्पष्ट केले. 

नगरमधून थोरात यांच्याशिवाय प्राजक्त तनपुरे व शंकरराव गडाख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर थोरात यांनी पालकमंत्रीपद नाकारले आहे. शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मंत्रीपदाच्या राजीम्याच्या चर्चेवर बोलण्याचे त्यांनी टाळले. तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे प्रत्येकाला संधी मिळेलच असे नाही. त्यातून पक्षाचे आमदार नाराज होत आहे. मात्र, त्यातून मार्ग काढण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असे थोरात यांनी सांगितले. 

कॉंग्रेस पक्षाचे आमदार कैलास गोरंट्याल नाराज आहेत. तशआ बातम्याही प्रसिद्ध झाल्या त्याबद्दल त्यांना विचारले असता त्यांच्याशी बोलून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे थोरात यांनी सांगितले. तीन पक्षांचे सरकार आहे. शरद पवार हे आम्हा सर्वांचे नेते आहे. त्यांचे मार्गदर्शन आम्हा सर्वांनाच मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या गुडबुक्‍समध्ये सर्वजण आहेत, असे थोरात यांनी सांगितले. 
सत्ता न मिळाल्याने भारतीय जनता पार्टीची अवस्था पाण्यावाचून तडफडणाऱ्या माशासारखी झाली आहे. मात्र, आमचे सरकार पूर्ण पाच वर्षे टिकेल व राज्यातील जनतेसाठी पूर्ण क्षमेतेने काम करेल, असा विश्‍वास थोरात यांनी व्यक्त केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com