बाळासाहेब थोरातही म्हणाले , 'मी पुन्हा येईन.... '

..
Fadnavis- Thorat
Fadnavis- Thorat

संगमनेर (नगर) : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका भाषणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मी पुन्हा येईन'चा नारा दिला होता. मात्र, निकालानंतर शिवसेनेच्या भूमिकेमुळे राज्याचे सगळे चित्रच बदलले. 


सध्या सोशल मीडियावर 'मी पुन्हा येईन'चे 'मीम्स' आणि 'पोस्ट' धुमाकूळ घालत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही नागपूर येथे पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांच्या 'मी पुन्हा येईन'ची खिल्ली उडवली होती . आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनीही 'मी पुन्हा येईन' असे म्हणत फडणवीस यांच्या वक्तव्याची चांगलीच खिल्ली उडविली.

संगमनेरमध्ये आयोजित 42व्या कवी अनंत फंदी व्याख्यानमालेचा समारोप शनिवारी झाला. या वेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार थोरात यांच्या मिस्कील स्वभावाची झलक सर्वांना अनुभवास आली.

आपल्या भाषणात थोरात म्हणाले, "गेल्या 42 वर्षांत अनंत फंदी व्याख्यानमालेतील फार थोड्या व्याख्यानांना मी मुकलो असेन. संगमनेरच्या सांस्कृतिक विश्वातील हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. त्यामुळे अनेक मोठ्या व्यक्तिमत्त्वांचा परिचय संगमनेरकरांना झाला. या महान व्यक्तिमत्त्वांनीही संगमनेरशी असणारी आपली ओळख कायम ठेवली.'' 

त्याच वेळी त्यांनी 'या व्याख्यानांसाठी मी पुन्हा येईन.. पुन्हा पुन्हा येईन...' अशी मिस्कील टिप्पणी करीत फडणवीस यांना टोला लगावला आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com