बाळासाहेबांनी जात नाही तर कर्तृत्व पाहून खैरेंसारख्या माणसांना संधी दिली : पवार 

शरद पवार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणात सर्वसामान्य व्यक्तीला कशी संधी दिली याचे उदाहर देतांना शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचा आर्वजून उल्लेख केला.
chandrakant_ Khaire
chandrakant_ Khaire

औरंगाबादः सर्वसामान्य माणसाला त्याची जात न पाहता कर्तृत्वाच्या  जोरावर राजकारणात संधी देण्याचे काम महाराष्ट्रात केवळ बाळासाहेब ठाकरे हेच करू शकतात हे त्यांनी दाखवून दिले, याचे उदाहरण देतांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा उल्लेख ट्रायडंटमधील बैठकीत पुन्हा एकदा केला.

भाजपचे सरकार अवघ्या ऐंशी तासात घालवल्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलात महत्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस महाआघाडीचे सर्व आमदार, नेते उपस्थित होते. या बैठकीत सर्वानुमते महाआघाडीचे नेते म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची निवड करण्यात आली.

त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करतांना शरद पवार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणात सर्वसामान्य व्यक्तीला कशी संधी दिली याचे उदाहर देतांना शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचा आर्वजून उल्लेख केला. पवार म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंनी कधी कुणाची जात पाहिली नाही, अगदी सर्वसामान्य माणसाला त्यांनी सत्तेच्या पदावर बसवले. चंद्रकांत खैरे हे त्याचे उदाहरण आहे. चंद्रकांत खैरे यांच्या जातीचे दोन चार हजार मतदारही  मतदारसंघात नसतील . पण त्यांचे कर्तृत्व आणि निस्था पाहून बाळासाहेबांनी त्यांना संधी दिली. ते खैरे गेल्या 30-35 वर्षापासून राज्य व केंद्रांच्या राजकारणात  काम करत आहेत.

विधानसभा, लोकसभेत ते निवडून  आले, त्यांना मी अनेक वर्षांपासून पाहतोय. आमदार, राज्यात मंत्री आणि केंद्रात सलग चारवेळा निवडूण येत काम करतांना खैरे यांच्याशी माझा संपर्क आला आहे. बाळासाहेबांनी खैरे यांनी जी संधी दिली ती त्यांची जात पाहून नाही, तर कर्तृत्व  पाहून याचा पुनरुच्चार देखील शरद पवारांनी केला.

शरद पवार यांनी यापुर्वी पुण्यात राज ठाकरे यांनी घेतलेल्या जाहीर मुलाखतीत देखील चंद्रकांत खैरे यांचे उदाहरण देत बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणात कशी सर्वसामान्य व्यक्तीला संधी दिली हे सांगितले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मतदारसंघातून चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. 

राज्यातील सत्तापेच सुटल्यानंतर आणि 1 डिसेंबर रोजी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असतांना शरद पवारांकडून खैरे यांचा महाआघाडीच्या महत्वाच्या बैठकीत उल्लेख झाला. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून खैरे यांचे पुर्नवसन आता होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com