शिवसेनाप्रमुखांचा उद्या स्मृतीदिन, दोन्ही कॉंग्रेसचे नेतेही करणार अभिवादन

शिवसेनाप्रमुखांचा उद्या स्मृतीदिन, दोन्ही कॉंग्रेसचे नेतेही करणार अभिवादन

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या स्मृतीदिन असून शिवाजीपार्क येथील कार्यक्रमात दोन्ही कॉंग्रेसचे नेतेही बाळासाहेबांना अभिवादन करणार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा (रविवारी) उद्या स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने त्यांना मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून लाखो शिवसैनिकांची गर्दी शिवतीर्थावर उसळणार आहे. शिवसेनाप्रमुखांना नमन करण्यासाठी उद्या शिवाजी पार्क इथे शिवसैनिक जमलेले आपल्याला पाहायला मिळतील. 

दरम्यान, रविवारी एनडीएने घटकपक्षांची बैठक बोलावली आहे. मात्र, या बैठकीला शिवसेनेचे नेते सहभागी होणार नाहीत. कारण सगळे शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवतीर्थावर जमणार आहेत. यावेळी बदललेल्या राजकीय समिकरणामुळे दोन्ही कॉंग्रेसचे काही नेतेही उपस्थित राहणार असल्याचे सागण्यात येत आहे. 

अशी आहे जय्यत तयारी : 
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना नमन करण्यासाठी उद्या हजारो नागरिक आणि शिवाजीपार्कवर जमणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेकडून मोठ्या प्रमाणावर तयारी सुरु आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी सध्या रंगरंगोटी आणि इतर व्यवस्था केली जाते. उद्या या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. पदाधिकारी आणि आमदारांसाठी एक वेगळे गेट असणार आहे. याचबरोबर मोठ्या प्रमाणावर सामान्य नागरिक देखील या ठिकाणी येणार असल्याने त्यांच्यासाठी दोन वेगळ्या गेट्‌सची सुविधा करण्यात आली आहे. 

राज्यात महाशिवआघाडी लवकरात लवकर सरकार स्थापन करणार आहे. अशात उद्या शिवसेनेव्यतिरिक्त राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे अनेक मोठे नेते हे शिवाजीपार्कवर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस नमन करण्यास येण्याची शक्‍यता आहे. अशात मोठ्या प्रमाणावर जय्यत तयारी सुरु आहे. राज्यात नवीन राजकीय समीकरण अस्तित्वात आले आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष भाजपच्या विरोधात एकत्र आले आहेत. त्यामुळे महाशिवआघाडीचे पदाधिकारी बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहतील. त्यामुळे उद्याच्या दिवसाला महत्व प्राप्त झाले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com