शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच नाव दिलं! उद्धव यांनी प्रश्नच निकाली काढला

नागपूर येथे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे पहिल्यांदाच आगमन
uddhav thackray first press conference in nagpur
uddhav thackray first press conference in nagpur

नागपूर : ठाकरे सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार बॅटिंग केली. सावरकरांच्या मुद्यावरून शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपने आधी सावरकरांचे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार करावे, असा सल्ला त्यांनी दिला. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देणार का, या प्रश्नावर त्यांना नावं दिलय, असे उत्तर दिले.

त्यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे

-जनतेच्या आशा, अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न- उद्धव ठाकरे 
-एक चहावाला देशाचा पंतप्रधान झाला त्याचा अभिमानच, पण त्याच पक्षाने अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानावर बहिष्कार टाकला

-शेतकऱ्याला कर्जमुक्तच नव्हे, तर चिंतामुक्त करण्याचा आमचा प्रयत्न  
-शेतकरी कर्जमाफीबद्दल लवकरात लवकर चांगला निर्णय घेतला जाईल
-बहिष्कार टाकण्याची पोटप्रथा सुरु झालीये

-स्वातंत्र्यवीर सावकरांच्या मुद्द्याबद्दल शिवसेनेची भूमिका स्पष्ट, आम्हाला सावरकरांच्या मु्द्द्यावरुन अडचणीत आणण्याचा प्रयत्न करु नये
-छत्रपती शिवाजी स्मारक याबाबत कोणी घोटाळा केला असेल तर ते निंदाजनक आहे, जो कोणी जबाबदार असेल त्यावर कारवाई करू
-देशाच उफाळलेल्या हिंसाचाराचं काय?, लोकं देशात असुरक्षित आहेत
-नागरिकत्व कायदा हा सावरकरांच्या भूमिकेविरोधी आहे
-छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाबाबत कोणी घोटाळा केला असेल तर ते निंदाजनक आहे, जो कोणी जबाबदारी असेल कारवाई करू
- सावरकरांच्या बाबतीत निर्णय घेण्यापासून तुम्हाला कोणी अडवलं? सावरकर मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांचा भाजपला सवाल 
-समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं
- आमचं मंत्रिमंडळ जनतेला बांधील, आम्ही वचनं पाळणारे
- नागरिकत्व कायदा तत्त्वाला धरुन आहे का? देशभरात उफाळलेल्या हिंसाचाराचं काय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com